AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan Firing Case : आरोपींच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर, सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे, आरोपींच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर..., सध्या सर्वत्र सलमान खान गोळीबार प्रकरणाची चर्चा सुरु... काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे.

Salman Khan Firing Case : आरोपींच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर, सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट
| Updated on: Jun 22, 2024 | 4:02 PM
Share

अभिनेता सलमान खान खान वांद्रे येथील घराबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. शिवाय पोलिसांनी अनेकांना अटक देखील केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर भाईजानचे चाहते देखील चिंतेत आहेत. दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात बिश्नोईचा भाऊ अनमोल याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडे सापडलेल्या फोनच्या ऑडिओतून मोठा खुलासा झाला आहे. सध्या सर्वत्र सलमान खान गोळीबार प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या फोनमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले आहे. सापडलेल्या ऑडिओ पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. ऑडीओ गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या ऑडिओ रेकॉर्डिंगशी जुळत असल्याची माहिची समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, अनमोल बिश्नोईचा ऑडिओ सँपल पोलिसांकडे होता. त्यानंतर आरोपींकडे सापाडलेला ऑडीओ देखील सारखाच असल्याची माहिती समोर आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

गोळीबार प्रकरणी सलमान खान याने देखील पोलिसांना माहिती दिली आहे. गोळीबाराच्या घटनेच्या आदल्या रात्री एका पार्टीनंतर उशिरा घरी पोहोचला होता. पहाटेच्या सुमारास बुलेटच्या आवाजाने त्याला जाग आली. ‘गोळीच्या आवाजाने धक्क्यातून मी जागा झालो आणि बाल्कनीमध्ये तपासण्यासाठी गेलो. बाहेर पाहिलं तर मला कोणीही दिसलं नाही’, असं सलमानने पोलिसांना सांगितलं. यावेळी अभिनेत्याला 150 पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. तर अनुज थापन आणि आणखी एका व्यक्तीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी अनुजने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली.

सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.