Bigg Boss 14 Grand Finale Latest Promo: महाअंतिम सोहळा ग्रँड होणार, धर्मेंद्र, रितेश आणि नोरा फत्तेही खास गेस्ट!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चा ग्रँड फिनाले आज रविवारी होणार आहे. हा फिनाले भव्य होणार असून यामध्ये धर्मेंद्र, रितेश देशमुख आणि नोरा फतेही दिसणार आहेत.

Bigg Boss 14 Grand Finale Latest Promo: महाअंतिम सोहळा ग्रँड होणार, धर्मेंद्र, रितेश आणि नोरा फत्तेही खास गेस्ट!

मुंबई : ‘बिग बॉस 14’  (Bigg Boss 14) चा ग्रँड फिनाले आज रविवारी होणार आहे. हा फिनाले भव्य होणार असून यामध्ये धर्मेंद्र, रितेश देशमुख आणि नोरा फतेही दिसणार आहेत. फिनालेचा एक प्रोमोसमोर आला असून त्यामध्ये तिघांची झलक दाखवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार माधुरी दिक्षीत बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषित करेल. (Bigg Boss 14 Grand Finale Latest Promo, The grand finale will be grand, with Dharmendra, Riteish and Nora Fateh as special guests)

चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनाले आज आहे.
मात्र, गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती.

आणि सर्वांनाच वाटत आहे की, बिग बॉस 14 ची विजेता रुबीना दिलैक होणार आहे.
राखी सावंतने बिग बॉसच्या घरात उशीरा एन्ट्री केली आहे. मात्र, राखी सावंत एन्ट्रीनंतरच बिग बॉस शोचा टीआरपी वाढला आहे. राखी शोमध्ये येण्याच्या अगोदर शोचा टीआरपी फक्त 1.1 असायचा पण तिच्या एंट्रीनंतर या शोची टीआरपी आता 1.9 च्या वर आहे.

परंतु ट्रेंडनुसार रुबीनाचे वर्चस्व आहे. सलमान खानने आपल्या शनिवार व रविवारच्या वीकेंड वारमध्ये म्हटले होते की, शो कोणीही जिंकू शकेल. रूबीनानंतर शोमध्येची प्रबळ दावेदार म्हणून राखी सावंतकडे बघितले जाते.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!

(Bigg Boss 14 Grand Finale Latest Promo, The grand finale will be grand, with Dharmendra, Riteish and Nora Fateh as special guests)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI