AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | महाअंतिम सोहळ्याचे बिगुल वाजले, ‘बिग बॉस 14’च्या घरातून कविता कौशिकसुद्धा घराबाहेर?

बिग बॉसला (Bigg Boss 14) अखेर आपले पहिले टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत. सलमान खानने या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये 'फिनाले' सुरू झाल्याचे घोषित केले होते.

Bigg Boss 14 | महाअंतिम सोहळ्याचे बिगुल वाजले, ‘बिग बॉस 14’च्या घरातून कविता कौशिकसुद्धा घराबाहेर?
| Updated on: Dec 02, 2020 | 11:57 AM
Share

मुंबई : बिग बॉसला (Bigg Boss 14) अखेर आपले पहिले टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत. सलमान खानने या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये ‘फिनाले’ सुरू झाल्याचे घोषित केले होते. त्याचवेळी सलमानने सांगितले होते की, या आठवड्यात केवळ चार स्पर्धक पुढे जातील आणि बाकीच्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. ‘बिग बॉस’ने मंगळवारी एक टास्क दिला होता. त्या टास्कमध्ये हरल्यामुळे अली गोनी घराबाहेर पडला. यामुळे आता बिग बॉसला त्यांचे ‘टॉप 4 फायनलिस्ट’ मिळाले आहेत.(Bigg Boss 14: Which 4 Contestants Will Be Finalists) या टॉप 4 फायनलिस्टमध्ये रुबीना दिलैक, जास्मीन भसीन, राहुल वैद्य आणि एजाज खान आहेत. मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क झाला असून, त्यामधून अभिनव शुक्ला आणि निक्की तंबोली बाहेर पडले. त्याचवेळी कविता कौशिकसुद्धा घराबाहेर पडली आहे. टास्कमध्ये राहून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कविताला बिग बॉसने शिक्षा दिली आणि तिला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले.

त्यानंतर बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडला आणि कविता घराबाहेर पडली. पण कविताचा ‘बिग बॉस’बरोबरचा करार अद्याप पूर्ण झालेला नाही. कारण जर कविता अशाप्रकारे घर सोडून गेली तर, तिला भारी नुकसान भरपाई द्यावी लागेल. आता बिग बॉसच्या घरात आणखी काय घडते हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला होता. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली होती आणि रूबीना सांगते की, मी आणि अभिनवने ऐकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता आणि हेच कारण होते की आम्ही बिग बॉसमध्ये आलो. हे सर्व सांगताना रूबीना रडताना दिसली होती. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली होती. मात्र प्रोमोमध्ये इम्युनिटी स्टोन एजाज खानला मिळाला. गेल्या आठवड्यातील एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता. अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संंबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा?

Bigg Boss 14 | जास्मीन, अली, रूबीना की अभिनव? ‘बिग बॉस’मधून एक सदस्य बेघर होणार!

(Bigg Boss 14: Which 4 Contestants Will Be Finalists)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.