AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : सलमानकडून अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; म्हणाला “पैसा-प्रेम सर्वकाही दिलं पण..”

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्याची एक नवी बाजू सध्या प्रेक्षकांना 'बिग बॉस 17'च्या माध्यमातून पहायला मिळतेय. या शोमध्ये भाग घेतल्यापासून दोघांमध्ये दररोज भांडणं होत आहे. या भांडणांदरम्यान विकी अंकिताचा सर्वांसमोर अपमान करताना दिसतोय.

Bigg Boss 17 : सलमानकडून अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; म्हणाला पैसा-प्रेम सर्वकाही दिलं पण..
Ankita Lokhande and Vicky Jain (2)Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2023 | 9:13 AM
Share

मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या रिअॅलिटी शोमध्ये पती विकी जैनसोबत भाग घेतला. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याआधी दोघं सोशल मीडियावर तरी ‘परफेक्ट’ जोडी असल्याचं चाहत्यांना दाखवत होते. मात्र आता बिग बॉसच्या घरात दररोज दोघांमध्ये भांडणं होताना दिसतात. ‘बिग बॉस 17’मधील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये विकी सतत अंकितासोबत रागाने बोलताना, तिचा अपमान करताना दिसत आहे. याबद्दल आता सूत्रसंचालक सलमान खानने विकीला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनीही त्याला ‘विषारी पती’ असा टॅग दिला आहे.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये विकी अंकिताला सुनावताना दिसतोय, “आयुष्यात तू मला काहीच देऊ शकली नाहीस. तर किमान मनाची शांती तरी दे.” त्याआधीच्या एपिसोडमध्ये अंकिता विकीकडे तक्रार करताना दिसतेय की, बिग बॉसच्या खेळात तो एकटाच पुढे जात आहे आणि यात कुठेतरी तिला मागे पडल्यासारखं वाटतंय. हे सर्व घडल्यानंतर ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने अंकिताची चांगलीच शाळा घेतली. “तू बिग बॉसमध्ये तुझी वेगळी ओळख गमवायला आली आहेस का? तू तुझा पती विकीसोबत इथे येण्याचा निर्णय घेतलास आणि तुझा पती दुसऱ्यांनाच तुझ्याशी भांडायला सांगतोय.”

पहा व्हिडीओ

सलमानचं वक्तव्य ऐकून विकीसुद्धा हैराण होतो आणि मस्करीत असं बोलल्याचं स्पष्टीकरण देतो. त्यावर सलमान विकीला म्हणतो, “ही मस्करी नव्हती.” हे सर्व घडत असताना अंकिताचे डोळे पाणावतात. त्यामुळे आता वीकेंड का वार एपिसोडमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनीही विकीला खूप ट्रोल केलं आहे. ‘अभिनव शुक्लाने रुबिना दिलैकची काळजी घेतली आणि तिच्यावर प्रेम केलं. अंकित गुप्ताच्या स्वत:च्या काही मर्यादा होत्या. तरीसुद्धा त्यानेही प्रियांका चहर चौधरीची काळजी घेतली. पण विकी जैन खूपच विषारी वृत्तीचा वाटतोय. तो सर्वांसमोर पत्नीचा अपमान करतोय. तिच्याप्रती त्याची वागणूक खूपच वाईट आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

‘नशिब सलमान खानने विकी जैनच्या वागणुकीची शाळा घेतली. अंकिताला त्याच्यापेक्षा खूप चांगला जोडीदार भेटला असता. मला अंकितासाठी वाईट वाटतंय’, असंही युजर्सनी म्हटलंय. काहींनी यात अंकिताच्या वागण्यावरही टीका केली आहे. ‘आपण ज्यांच्या भांडणाची फक्त एकच बाजू बघतोय’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर ‘विकीच्या या वागणुकीसाठी अंकितासुद्धा तेवढीच कारणीभूत आहे’, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...