“मी हात जोडून माफी मागतो”; ‘बिग बॉस’ने तडकाफडकी घराबाहेर काढल्यानंतर स्पर्धकाकडून विनवणी

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरातून प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सनी आर्या उर्फ ‘तहलका भाई’ला तडकाफडकी बाहेर काढण्यात आलं होतं. अभिषेक कुमारची कॉलर पकडून त्याला धक्का दिल्याप्रकरणी बिग बॉसने सनी आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तहलका भाईने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वत:वर नियंत्रण ठेवू […]

मी हात जोडून माफी मागतो; 'बिग बॉस'ने तडकाफडकी घराबाहेर काढल्यानंतर स्पर्धकाकडून विनवणी
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 8:42 AM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरातून प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सनी आर्या उर्फ ‘तहलका भाई’ला तडकाफडकी बाहेर काढण्यात आलं होतं. अभिषेक कुमारची कॉलर पकडून त्याला धक्का दिल्याप्रकरणी बिग बॉसने सनी आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तहलका भाईने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकलो नाही, याचा मला पश्चात्ताप आहे आणि मी चाहत्यांची हात जोडून माफी मागू इच्छितो”, असं तो म्हणाला. या मुलाखतीत तहलका भाई अभिषेकसोबत झालेल्या भांडणाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाला.

सनी आर्या म्हणाला, “बिग बॉसच्या घरात ते भांडण आधी ईशा मालवीय आणि अरुण भाई (अरुण महाशेट्टी) यांच्यात होत होतं. या भांडणात अभिषेकने उडी घेतली आणि तो अरुण भाईशी खूप वाईट पद्धतीने बोलत होता. मला ते सहन झालं नाही. ते पाहून मला खूप राग आला. मी मानतो की माझ्याकडून चूक झाली आणि मला त्याचा पश्चात्ताप आहे. पण मी माझ्या भाईसाठी इतका चिडलो होतो. अरुण भाईसोबत जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल, तर मी गप्प नाही राहू शकत. पण अभिषेकला धक्का दिल्याचा मला पश्चात्ताप आहे.”

“मी बिग बॉसकडे याबद्दल माफी मागितली आहे. पण मी मला माझ्या चाहत्यांचीही माफी मागायची आहे. मी हात जोडून त्यांची माफी मागतो की मला क्षमा करा. मी तुम्हाला निराश केलं. माझे चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांच्यासमोर माझी चूक स्वीकारतो. भविष्यात मला पुन्हा संधी मिळाली तर बिग बॉसमध्ये जाऊन मी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेन”, असंही तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं होतं?

तहलका भाई आणि अभिषेक कुमार यांच्यातील भांडणाची सुरुवात अरुणपासून झाली. अरुण ‘दिल’ रुममध्ये इशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांना उठवायला गेला होता. यावेळी इशा आणि अरुण यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. या वादात इशाचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकने उडी घेतली. त्याने अरुणला इशाशी नीट बोलण्याचा इशारा दिला. मात्र ही गोष्ट अरुणला आवडली नाही. अरुण आणि अभिषेकच्या या वादात नंतर अरुणचा खास मित्र तहलका भाईने उडी घेतली. या भांडणापासून लांब राहण्याचा सल्ला त्याने अभिषेकला दिला. याचवेळी तहलकाचा राग अनावर होतो आणि तो अभिषेकची कॉलर पकडतो.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...