Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकी पोलिसांच्या ताब्यात, हुक्का पार्लरमध्ये रेडदरम्यान कारवाई

'बिग बॉस 17'चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं आणि वादाच जुनं नातं आहे. सध्याही तो नव्या वादात सापडला. हुक्का बारमध्ये मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं. त्याच्या इतर 13 लोकांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

'बिग बॉस' फेम मुनव्वर फारुकी पोलिसांच्या ताब्यात, हुक्का पार्लरमध्ये रेडदरम्यान कारवाई
मुनव्वर फारूकीला पोलिसांनी हुक्का पार्लरमधून ताब्यात घेतलं होतं.
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 9:02 AM

‘बिग बॉस 17’चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं आणि वादाच जुनं नातं आहे. सध्याही तो नव्या वादात सापडला. हुक्का बारमध्ये मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं. त्याच्या इतर 13 लोकांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. फोर्ट परिसरातल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरमध्ये हे आरोपी सापडले होते. पोलिसांनी त्या हुक्का बारवर छापा टाकून कारवाई केली होती. तेथून मुनव्वरसह १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र जामीनपत्र गुन्हा असल्याने पोलिसांनी आरोपीना नोटीस देऊन सोडलं.

या कारवाईत 4400 रुपये कॅश आणि 9 हुक्का पॉट जप्त करण्यात आलेत. तसेच एकूण 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर खुद्द मुनव्वर फारूकीने , तो एअरपोर्टवर जात असल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. थकलोय पण प्रवास करतोय… असं त्याने त्यामध्ये लिहीलं आहे. पोलिसांच्या या छाप्याशी मुनव्वरचा काहीही संबंध नाहीये, असं एकीकडे त्याच्या टीमकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पण दुसरीकडे या छाप्याशी निगडीत पोलिस अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली माहिती काही वेगळीच आहे. ‘ हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने मुंबईतील हुक्का बारवर छापे टाकले. तिथे सापडलेल्या गोष्टींची चौकशी केली जात आहे. आणि तेथून ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये मुनव्वर फारूकीचाही समावेश होता, ‘ असे त्या अधिकाऱ्याने नमूद केले.

फक्त चौकशी झाली

खरंतर, मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून हुक्का बारमधून १४ जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला सोडून दिले. मात्र, या प्रकरणी मुनव्वर यांनी कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिलेले नाही.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.