AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : माझ्या बहिणीसोबत का झोपेन…, बाहेर येताच सलमान खानवर का भडकला बसीर?

Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' फेम बसीर घरातून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केलाल. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बसीर याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Bigg Boss 19 : माझ्या बहिणीसोबत का झोपेन..., बाहेर येताच सलमान खानवर का भडकला बसीर?
फाईल फोटो
| Updated on: Oct 28, 2025 | 3:20 PM
Share

Bigg Boss 19 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्टेट वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ शो गेल्या दोन महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शो मधील वाद, टास्क आणि नाती… सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, नुकताच बसीर अली शोमधून बाहेर आला. पण शोमधून बाहेर येताच त्याने अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसवर निशाणा साधला आहे… शोमध्ये त्यांच्याबद्दल असं काही बोलण्यात आलं, ज्यामुळे त्याचं करीयर उद्ध्वस्त होऊ शकतं… असं खुद्द बसीर अली म्हणाला. प्रणितने बहिणीबद्दल केलेल्या टिप्पणीवर बसीर अली याने संताप व्यक्त केला. सलमान खानने अशा टिप्पण्यांना आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न देखील बसीर याने उपस्थित केला. बसीर अली याचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया.

बसीर अली आणि नेहल चुडासमा ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर…

बसीर अली आणि नेहल चुडासमा यांना नुकतेच ‘बिग बॉस 19’ मधून काढण्यात आले. शोमधून बाहेर काढण्यात आलेल्या बसीर अली याने सलमान खानसह निर्माते आणि स्पर्धकांवर संताप व्यक्त केला. नुकताच झालेल्या मुलाखतीत बसीर याला मालती आणि अमलने तुझ्या लैंगिकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले, याबद्दल तुला काही माहिती आहे का? असा प्रश्न विचारला.

यावर बसीर म्हणाला, ‘शोमधून बाहेर काढल्यानंतर मला कळलं… माझ्या लैंगिकतेबद्दल ते दोघे मला विचारु शकत होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावर बिग बॉस आणि सलमान खान यांनी प्रश्न उपस्थित केले नाहीत…’ यामुळे बसीर याने सलमान खान याच्यावर संताप व्यक्त केला.

मालती हिच्यावर भडकला बसीर…

बसीर अली म्हणाला, ‘वाइल्ड कार्ड मालती हिला गेम सेंस नाही… अर्थ नसलेल्या मुद्यांवर ती सर्वांसोबत गॉसिप करत असते… तिच्यामध्ये एवढी हिंमत नाही येऊन मवा विचारेल… नॅशनल टेलिव्हिजनवर लैंगिकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि प्रतिमा कलंकित केल्या जात आहेत. यामुळे कोणाचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, तर कोणाचे जीवन धोक्यात येऊ शकतं. जेव्हा माझ्याबद्दल अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तेव्हा बिग बॉसने माझ्या बाजूनं उभं राहणं योग्य समजलं नाही. बिग बॉसच्या घरात एखाद्याला काहीतरी बोलल्याबद्दल मला फटकारण्यात आले.’

प्रणितने बसीर अलीच्या बहिणीवर केलेली टिप्पणी

बसीर पुढे म्हणाला, ‘प्रणितने माझ्यासाठी एक वक्तव्य केलं होतं. मला माझी बहीण पण चालेल… याचा काय अर्थ होतो… मी माझ्या बहिणीसोबत झोपेल? बिग बॉसने हि क्लिक पोस्ट कली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे बिग बॉसला प्रणितला याबद्दल प्रश्न विचारावा लागला. सलमान  खान  आणि बिग बॉस यांनी एका चांगल्या शोमध्ये या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे…’ असं देखील बसीर म्हणाला.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.