AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहरुंनी पैसे दान केले, इंधिरा गांधींनी दागिने दिले, तुम्ही काय केलं? कुनिकाचा पंतप्रधानांना रोखठोक सवाल

अभिनेत्री, वकील आणि सोशल वर्कर कुनिका सदानंद कायम देशाच्या मुद्यावर रोखठोक बोलत असते. आता देखील अभिनेत्री दिवसागणिक वाढत्या महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक प्रश्न विचारला आहे... जाणून घ्या असं काय म्हणाली अभिनेत्री...

नेहरुंनी पैसे दान केले, इंधिरा गांधींनी दागिने दिले, तुम्ही काय केलं? कुनिकाचा पंतप्रधानांना रोखठोक सवाल
| Updated on: May 16, 2026 | 12:14 PM
Share

अभिनेत्री आणि बिग बॉस 19 शोची स्पर्धक कुनिका सदानंद कायम स्वतःचे विचार आणि मत स्पष्ट आणि रोखठोक मांडत असते, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम तिच्या स्पष्ट आणि निडर आवाजात बोलताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने असंच काही केलं आहे. नुकताच झालेल्या एका संवादादरम्यान, अभिनेत्रीने देशातील वाढत्या महागाईवर स्वतःचं मत मांडलं आहे आणि देशात पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या दरांपासून राजकीय पक्षांवर निशाणा साधण्यापर्यंत… अभिनेत्री कुनिका सदानंद खूप काही बोलली आहे.

नुकताच कुनिका म्हणाली, ‘मी हेल्पलेस आहे… संस्था आणि सिस्टम एकाच पार्टीसाठी काम करत आहे… लोकांना एक विनंदी आहे की, त्यांनी रस्त्यांवर उतरलं पाहिदे… स्वतःचा आवाज उठवला पाहिजे… आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. मला असं वाटतं की, खूप काही चुकीचं होत आहे… मला एकच चिंता सतावत आहे की, देशात होणार बदल पाहण्यासाठी मी जिवंत राहील की नाही… ‘

पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीवर कुनिका म्हणाला, ‘तुमच्याकडे पीएम केयर फंड आहे. भाजपकडे सर्वात जास्त रोख रक्कम आहे… आहे तर देशासाठी दान करा नाही… देशाकडूनच ते पैसे तुम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे पुन्हा देशाला द्या… आपचे जे जुने पंतप्रधान होते, पंतप्रधान नेहरु यांनी दिलं होतं. नेहरु यांनी दिल्लीत पैसे दान केले होते. अलाहाबादमध्ये किती पैसे दान केले होते. इंदिरा गांधी यांनी स्वतःचे दागिने दिले, आता तुम्हीपण करा…’

पुढे कुनिका म्हणाली, ‘जे देशाचा विचार करत नाहीत, ती चांगली लोकं नाहीत. तुम्हाला दिसत असेल, लोकं उपाशी झोपत आहेत, LPG मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. तुम्ही 300 गाड्यांचा ताफा घेऊन जात आहात, हे सर्वकाही काय आहे?’ असा प्रश्न देखील अभिनेत्री कुनिका हिने यावेळी उपस्थित केला.

कोण आहे कुनिका संदानंद?

कुनिका एका प्रसिद्घ आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘बेटा’, ‘खिलाडी’ आणि ‘हम साथ-साथ’ सिनेमात कुनिका हिने काम केलं आहे.. शिवाय अनेक मालिकांमध्ये देखील तिने भूमिका साकारल्या आहेत. कुनिका वकील आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहे… कुनिका अभिनेता सलमान खान याच्या विवादीत शो ‘बिग बॉस 19’ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण