Bigg Boss 19: फेक संस्कारी! पदर खाली पाडून, कॅमेरा समोर ब्लाऊज घालून… बिग बॉसमधील स्पर्धकाचे खरे रुप समोर
सध्या बिग बॉसची स्पर्धक तान्या मित्तल चांगलीच चर्चेत आहे. शोमध्ये एण्ट्री केल्यानंतर मी किती संस्कारी आहे, माझ्यावर वेगळे संस्कार झाले आहेत असे ती बोलताना दिसली होती. आता सोशल मीडियावर तिची ही प्रतिमा फेक असल्याचे म्हटले जात आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे 19वे सिझन नुकताच सुरु झाले आहे. या वेळी शोमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी प्रवेश केला आहे. शोमध्ये तान्या मित्तल देखील दिसत आहे. शोमध्ये तिची ओळख आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर म्हणून करून देण्यात आली आहे. पण शोमध्ये प्रवेश करताच तान्या ट्रोल होऊ लागली आहे. तान्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर ब्लाउज घालताना दिसत आहे. तर दुसरीकडे तान्या शोमध्ये संस्कारी प्रतिमा कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
तान्याचे व्हिडीओ व्हायरल
तान्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या डिझाइनचे ब्लाउज घालताना दिसत आहे. तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की तुम्ही किती ब्लाउज पाहिले. तसेच, तान्याने असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ब्लाउज आणि पेटीकोट घालून साडी नेसताना दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर कपडे घालण्यामुळे तान्या ट्रोल होत आहे.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
View this post on Instagram
‘फेक संस्कारी’
तान्याचा हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवर एका युजरने तान्याचा ब्लाउज घातलेला व्हिडीओ शेअर करत म्हटले, “तान्या प्रणित मोरेला म्हणते की, नाही माहीत अभिनेत्रींना बिग बॉसपर्यंत येण्यासाठी काय काय करावे लागते. मी तर साडी नेसून आले आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मी तान्याला विचारू इच्छिते की, साडी नेसून की कॅमेरा समोर ब्लाउज घालून. मी ब्लाउजवाली क्लिप याचसाठी टाकली आहे. मी तो व्हिडीओही दाखवू शकते ज्यामध्ये तुमचा पदर अचानक खाली पडतो. तुम्ही स्वतःच तुमचे रहस्य उघडले आहेत. जर तुमच्याकडे इतके पैसे आहेत, तर तुम्ही बिग बॉस आणि इन्स्टाग्रामवर काय करत आहात? इन्स्टाग्रामवर व्हिडीओ का बनवत आहात? फेक संस्कारी.”
सांगायचे तर, याशिवाय शोमध्ये तान्याने सांगितले की ती नेहमी बॉडीगार्डसोबत असते. ती एकटी घराबाहेरही पडत नाही. तिच्या घरी कोणत्याही मुलाशी बोलण्याची परवानगी नाही. तान्याने हेही सांगितले की, तिला कोणी नावाने हाक मारणे आवडत नाही. सर्वजण तिला बॉस म्हणतात. तान्याच्या या सर्व गोष्टी ऐकून घरातील सदस्यही गोंधळलेले दिसतात. अशनूर तिला बनावटही म्हणते.
