अरबाज पटेल याने केले महाराष्ट्राला चॅलेज, रितेश देशमुख याच्यासमोर थेट म्हणाला, माझ्यासारखी…
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हे सीजन धमाका करताना दिसत आहे. चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ या सीजनबद्दल नक्कीच आहे. रितेश देशमुख हे सीजन होस्ट करताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदासाठी नुकताच एका टास्क झाला.

बिग बॉसमध्ये मोठा धमाका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदाचे सीजन चांगलेच हीट झाल्याचे बघायला मिळतंय. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. चाहत्यांमध्येही या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळतंय. विशेष म्हणजे रितेश देशमुख या सीजनला होस्ट करतोय. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी रितेश देशमुख हा घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसतोय. रितेश देशमुख याने निकी तांबोळी हिला म्हटले की, बिग बॉसच्या घरात तुझा एक वेगळाच बिग बॉस सुरू आहे. मात्र, तुझ्या बिग बॉसमध्ये काहीही बोलले तरीही चालते. आमच्या बिग बॉसमध्ये ती भाषा वापरण्यास चालत नाही.
मुळात म्हणजे बाहेर काय सुरू आहे हे बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या सदस्यांना अजिबात कळत नाही किंवा तशी परवानगी नाहीये की, बाहेर काय सुरू आहे, याची कल्पना घरातील सदस्यांना द्यायची. मात्र, आता नुकताच बिग बॉसच्या निर्मात्यांनीच हा नियम मोडला आहे. नुकताच रितेश देशमुख याने घरातील सदस्यांना सोशल मीडियावरील काही कमेंट या वाचून दाखवल्या आहेत. यावरून घरात एकच मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.
एका युजर्सने लिहिले की, अरबाज पटेल हा सूरज चव्हाण याच्यावर दादागिरी करत होता. मात्र, आमचा सूरज चव्हाणही गावाकडची भाजी भाकरी खाल्लेला माणूस आहे. त्यामुळे अशी प्रोटिन पावडर खाऊन तयार केलेली ही बॉडी काही कामाची नाही. खरा माणूस लागतो. यावर अरबाज पटेल हा म्हणाला की, ठिक आहे मी महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांना चॅलेज करतो की, तुम्ही प्रोटिन पावडर खाऊन तयार करा अशी बॉडी.
अरबाजने त्याची बॉडी ही प्रोटीन पावडर खाऊन तयार केली असल्याचे म्हणणाऱ्यांना जोरदार उत्तरच त्याने दिले आहे. मात्र, त्याने थेट महाराष्ट्रातील लोकांनाच चॅलेज केले आहे. अरबाज पटेल याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर अनेकांनी अरबाज याच्या विधानानंतर त्याच्यावर टीका करण्यासही सुरूवात केलीये.
आता बिग बॉस मराठीच्या सीजनचा कॅप्टन हा अरबाज पटेल आहे. विशेष म्हणजे तो घरात धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. अरबाज आणि निकी तांबोळी हे बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच एकत्र दिसत आहेत. निकी तांबोळीला बिग बॉसच्या घरात सपोर्ट करतानाही अरबाज पटेल हा दिसतो. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज यांच्यामध्ये वादही बघायला मिळाला.