छोट्या पुढारीसोबत आर्याने घेतला पंगा, घनश्याम दरोडे थेट म्हणाला, आता तुला…
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. अनेक दिग्गज कलाकार या शोमध्ये सहभागी झाले आहेत. नुकताच आता बिग बॉसच्या घरात कॅप्टनशीचा टास्क पार पडलाय.
बिग बॉस मराठीच्या घरात धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. रितेश देशमुख हे सीजन होस्ट करताना दिसतोय. टीआरपीमध्येही हे सीजन धमाल करत आहे. रितेश देशमुख याचेही लोकांकडून काैतुक केले जातंय. अनेक नामवंत नावे या सीजनमध्ये सहभागी झाली आहेत. या सीजनकडून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन होताना दिसत आहे. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन आहे. नुकताच घरात मोठे वाद होताना दिसले. खाण्यावरूनही वाद होत आहेत. चपातीवरून अंकिता आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये चांगलेच वाजल्याचे बघायला मिळाले.
बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झालाय. यावेळी बिग बॉसच्या घरात एक चूल बघायला मिळाली. प्रत्येक सदस्याच्या गळ्यात घरातील दुसऱ्या सदस्याचा फोटो दिलाय. या चुलीमध्ये आपल्या गळ्यातील फोटो टाकून समोरच्या व्यक्तीला नॉमिनेशन करण्याचा हा टास्क होता. निकी तांबोळी घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित राहिली.
यावेळी आर्या जाधव ही घनश्याम दरोडे अर्थात छोट्या पुढारीला पकडताना दिसली. यावेळी आर्या जाधव आणि छोट्या पुढारीमध्ये वाद बघायला मिळाला. छोटा पुढारी आर्याला म्हणाला की, तू मला पकडू नको…आणि दूर उभा राहा. मात्र, यावेळी आर्या जाधव ही छोट्या पुढारीला धक्का देताना दिसली.
छोटा पुढारी हा म्हणाला की, थांब आता तुला दाखवतो…यावेळी दोघेही एकमेकांना बऱ्याच गोष्टी सुनावताना दिसले. छोट्या पुढारीनंतर आर्या जाधव आणि अंकिता यांच्यामध्येही वाद बघायला मिळाला. अंकिता ही आर्याला गेम समजून सांगताना दिसली. मात्र, हे आर्याला आवडले नाही. आर्याने चूक केल्याचे सांगताना अंकिता ही दिसत होती.
दुसरीकडे अरबाज, जान्हवी आणि छोटा पुढारी हे निकी तांबोळी हिच्यावर नाराज असल्याचे बघायला मिळतंय. हे सर्वजण म्हणतात की, कॅप्टनशी मिळाल्यापासून निकी तांबोळी ही पूर्णपणे बदलली आहे. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात धमाका होणार हे नक्की आहे. लोकांमध्ये बिग बॉसच्या या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळतंय.