AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता 'बिग बॉस मराठी 6' फेम विशाल कोटियनने प्रतिक्रिया दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”
विशाल कोटियनImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 26, 2026 | 12:10 PM
Share

1 मे नंतर मराठी भाषा बोलू न शकणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने थेट रद्द करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कितीही विरोध झाला तरी या निर्णयावर आपण ठाम राहणार असल्याचं प्रताप सरनाईक वारंवार स्पष्ट करत आहेत. या वादावर आता ‘बिग बॉस मराठी 6’ फेम विशाल कोटियनने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे, असं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला विशाल?

‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, “माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी जन्माने, कर्माने आणि मनानेही मराठी आहे. मी मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. मध्यंतरी हिंदीत काम करताना माझी मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉस मराठीमुळे मला पुन्हा स्पष्ट मराठी बोलता येतंय. मला मराठी भाषेविषयी आणि महाराष्ट्राविषयी प्रचंड आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे, याच मताचा मीसुद्धा आहे. बाहेरच्या राज्यांमध्येही असंच आहे. तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. पण इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. प्रताप सरनाईकांचा निर्णय योग्य आहे. मराठी यायलाच पाहिजे. मराठीत बोला, कारण हा महाराष्ट्र आहे.”

परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी भाजपने मराठी शिकवणी वर्गसुद्धा सुरू केले आहेत. काही रिक्षा चालकांनी त्यासाठी मराठी भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे. याआधी अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली होती.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं