AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस विजेता सूरज चव्हाण ‘या’ सिनेमात काम करणार; पठ्ठ्याने सिनेमाचं नावच फोडलं

'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले झालाय. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळतंय. बारामतीचा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी 5 चा विजेता झालाय. सूरज चव्हाण याला लोकांनी प्रचंड प्रेम दिले. सुरजने मोठा इतिहास नक्कीच रचला आहे.

बिग बॉस विजेता सूरज चव्हाण 'या' सिनेमात काम करणार; पठ्ठ्याने सिनेमाचं नावच फोडलं
Suraj Chavan
| Updated on: Oct 08, 2024 | 6:12 PM
Share

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता सूरज चव्हाण हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरज चव्हाण हा बारामतीचा असून अस्सल ग्रामीण भागातून आलाय. विशेष म्हणजे सूरज ज्यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करत होता, त्यावेळी त्याच्याकडे फक्त दोन जोडी कपडे आणि तुटलेली चप्पल होती. आता थेट बिग बॉसचा विजेता तो झालाय. मुळात म्हणजे सूरज चव्हाण हे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध असलेले नाव आहे. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता झाल्यापासून त्याच्यावर काैतुकांचा वर्षाव केला जातोय. बारामतीमधील मोढवे या त्याच्या गावी सूरज परतलाय.

गावकऱ्यांनी सूरजचे जोरदार स्वागत देखील केल्याचे बघायला मिळतंय. नुकताच सूरज चव्हाण याने मोठे भाष्य केले. सूरज चव्हाण हा म्हणाला की, मी पहिल्यांदा माझ्या शाळेला भेट दिली मला अभिमान आहे या शाळेत शिकण्याचा. सर मला खूप शिकवायचे पण माझी गरीब परिस्थिती होती. मला इच्छा नव्हती म्हणून मी शिकलो नाही. परंतु माझ्या बहिणींना शिकण्यास भेटले.

आता मी मराठी शिकणार आहे. महाराष्ट्रातील अख्या आयांनी बहिणींनी भावांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. मला बहिणी नेहमी सांगायच्या जा तू इथून काहीतरी कर गावात कोण कोणाचं नसतं भावा. आता माझा पॅटर्न झापुक झुपुक बादशाह माझा राजा राणी सिनेमा सर्वांच्या भेटीला येणार आहे.

पुढे सूरज म्हणाला की, मुंबईला काय सांगू असली तुफान गर्दी मला यायला जमेना. मुंबईत मला काय कळनाच मी कुठे आणि मला काहीच सुचत नव्हतं. सिद्धिविनायकच्या मंदिरात मी ठरवले होते ट्रॉफी घेऊनच जाणार. विशेष म्हणजे यावेळी सूरजने प्रसिद्ध डायलॉग म्हणून दाखविला. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सूरज चव्हाणचे नशीब चांगलेच उजळल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉसच्या निर्मात्यांकडून 14 लाखांचे बक्षिस सूरजला मिळाले. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण हा चांगलाच मालामाल झाल्याचे बघायला मिळतंय. सूरज चव्हाण धमाकेदार गेम खेळताना बिग बॉसच्या घरात दिसला. अभिजीत सावंत हा उपविजेता ठरलाय. निकी तांबोळी ही देखील टॉप 3 पर्यंत पोहोचली होती. यंदाच्या सीजनने अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केल्याचे बघायला मिळतंय.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.