AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday | वयाच्या 15व्या वर्षी घरातून केले होते पलायन, इंडस्ट्रीमध्ये आल्यावर लागले होते ड्रग्जचे व्यसन! वाचा बॉलिवूडच्या क्वीनची कथा…

बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा आज वाढदिवस आहे. कंगना ही बॉलिवूडमधली एक बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री आहे. ती प्रत्येक विषयावर उघडपणे बोलते.

Happy Birthday | वयाच्या 15व्या वर्षी घरातून केले होते पलायन, इंडस्ट्रीमध्ये आल्यावर लागले होते ड्रग्जचे व्यसन! वाचा बॉलिवूडच्या क्वीनची कथा...
कंगना रनौत
| Updated on: Mar 23, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा आज वाढदिवस आहे. कंगना ही बॉलिवूडमधली एक बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री आहे. ती प्रत्येक विषयावर उघडपणे बोलते. कंगनाने एकदा स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला होता, की ती एक ड्रग व्यसनी होती. कंगना म्हणाली, ‘जेव्हा मी 15 किंवा 16 वर्षांचे होते, तेव्हा मी घर सोडून पळून गेले होते. तेव्हा मला वाटले की, मी आत दुनिया माझ्या मुठीत ठेवेने. घर सोडल्यानंतर मी व्यसनाधीन झाले होते.’ कंगनाने म्हणते, ‘घराबाहेर पडल्यानंतर दीड ते दोन वर्षात मी फिल्म स्टार आणि एक ड्रग व्यसनाधीनही होते. माझ्या आयुष्यात बरेच प्रॉब्लम सुरु होते. मी अशा लोकांच्या हातात अडकले होते, जिथून मला बाहेर पडता येत नव्हते.’(Birthday Special Bollywood Actress Kangana Ranaut reveled that she was drug addict)

काम करू नये म्हणून इंजेक्शन दिले!

एका मुलाखतीत कंगना म्हणाली की, ‘यावेळी ती एका व्यक्तीला भेटली होती आणि त्या व्यक्तीनेच कंगनाला व्यसनाधीन केले होते.’ कंगना म्हणाली, ‘मला एका पार्टीत नेण्यात आले होते. त्यावेळी माझ्या ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळण्यात आले. कारण त्यावेळी जे काही घडले ते माझ्या स्वत:च्या इच्छेनुसार घडत नव्हते. मग ती व्यक्ती स्वत:ला माझा नवरा मानू लागली. जेव्हा मी त्याला सांगत असे की तुम्ही माझा प्रियकर किंवा पती नाही, तेव्हा तो मला चप्पलने मारहाण करायचा. मला काम करता येऊ नये म्हणून त्याने मला इंजेक्शन देण्यास सुरुवात केली होती.’

थलायवीचा ट्रेलर होणार रिलीज

आज कंगानाच्या वाढदिवशी तिच्या आगामी चित्रपटाचा ‘थलायवी’चा ट्रेलरही रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी कंगनाच्या वाढदिवशी हे खास गिफ्ट देण्याचा विचार केला आहे. जयललिताच्या जीवनातील प्रत्येक पैलू थलायवीमध्ये दाखवला जाईल. त्यात जयललितांचा अभिनेत्रीपासून तामिळनाडूच्या राजकारणापर्यंतचा प्रवास दाखवला जाईल. त्या किती उदार होत्या, यावर लक्ष केंद्रित केले जाईल (Birthday Special Bollywood Actress Kangana Ranaut reveled that she was drug addict).

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत

कथेच्या आणि पात्राच्या मागणीनुसार कंगनाला वजन वाढवावं लागलं होतं. यावेळी, सर्वात मोठे आव्हान होते की, तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते. अशा परिस्थितीत कंगनाने खूप कठोर मेहनत केली. खुद्द कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने लिहिले की, ‘जेव्हा ट्रेलर लाँचिंगसाठी केवळ एक दिवस दूर आहे, तेव्हा मी असे म्हणू शकते की काही महिन्यांत, 20 किलो वजन वाढवणे आणि घटवणे कदाचित सर्वात मोठे आव्हान नव्हते. काही तासांत ही आपली प्रतिक्षा संपणार आहे आणि त्यानंतर जया कायमची तुमची असेल.’

चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार

कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटासाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधीही कंगनाने 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरण्याची ही कंगनाची चौथी वेळ आहे.

(Birthday Special Bollywood Actress Kangana Ranaut revealed that she was drug addict)

हेही वाचा :

गर्दीनं डोकं फिरलं अन् ‘डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया…’ सूचलं; वाचा अफलातून किस्सा!

PHOTO | पडद्यावरच्या ‘सोयराबाईं’चा हा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.