हेमांगी कवी पोळ्या लाटत होती, ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, चित्रा वाघ संतापल्या

महिलांच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?" अशा प्रश्नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी केली.

हेमांगी कवी पोळ्या लाटत होती, ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, चित्रा वाघ संतापल्या
Hemangi Kavi Chitra Wagh


पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी “किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही?” असा सवाल यानिमित्त उपस्थित केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या पोळ्या लाटण्याच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स आल्या, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलं.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” अशा प्रश्नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी केली.

“लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेत”

“एक अतिशय साधा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ हेमांगीने पोस्ट केला होता. त्यावर इतक्या घाणेरड्या पद्धतीने कमेंट्स आल्या. म्हणजे लोकांची जी नजर आहे, ती सुधारण्याचे नावच घेत नाही. इन्स्टाग्राम हे एक मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेऊन ती येत असते. त्या पोळ्या लाटण्याच्या छोट्याशा इन्स्टाग्राम पोस्टवरुन, त्याच्यावर नजर न टाकता, नको त्या गोष्टींवर बारीक रितीने पाहणं, त्यावर अश्लील लिहिणं, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेत” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

ही ट्रोलर्स मंडळी बऱ्याच अभिनेत्रींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतकी अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्स लिहितात, की त्या मुली ही वाचू शकणार नाहीत, पण या गोष्टीला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

हेमांगीने शेअर केलेला पोळ्या लाटण्याचा व्हिडीओ

पाहा हेमांगीची पोस्ट :

संबंधित बातम्या :

“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, त्यांनी…” बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवलं, तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती? : तृप्ती देसाई

(BJP Leader Chitra Wagh talks on Marathi Actress Hemangi Kavi trolled over Instagram Reels Video making Chapati)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI