AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवलं, तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती? : तृप्ती देसाई

"ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?" असा मनमोकळा सवाल अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुक पोस्टमधून विचारला होता, त्यावरुन तृप्ती देसाईंनी तिला फटकारलं

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवलं, तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती? : तृप्ती देसाई
Hemangi Kavi Trupti Desai
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 8:54 AM
Share

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता? असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.

हेमांगी कवी काय म्हणाली?

आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे.  पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं.

मी एक पोळी लाटतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला खूप मेसेज आले. त्या व्हिडीओत माझे बूब्ज हलताना दिसतायेत वगैरे असं म्हटलं गेलं. त्याच्यावर अनेकांनी भाष्य केलं. तू मूर्ख आहेस, कामं मिळवण्यासाठी काहीही करतेस का? माझ्या घरी मुलगी असती तर, कानफडवलं असतं वगैरे असं म्हटलं. 7-8 बायकांनी तर मला सांगितलं डिसेंट वाग, डिसेंट कपडे घाल. एक स्त्री असं म्हणते, मला संताप आणि दु:ख वाटलं. बाईच बाईला हे सांगते.

पण कशासाठी? ती स्वत:च यातून जात असते. आपण 100 बायकांना विचारलं, तुम्हाला ब्रा घालायला आवडतं का, तर 99 म्हणतील नाही, नकोसं वाटतं. मग अभिनेत्री किंवा कोणत्याही मुलीवर हे का लादलं जातं? तुमचं मत असेल, तर तुमच्याजवळ ठेवा. मी का करते, कशासाठी करते, पैसे मिळवायचे आहे का, याबाबत लोक जजमेंटल होतात, त्यावरुन मी व्यक्त झाले.

महिलांनी बुजरेपणा सोडून व्यक्त व्हावं!

महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणो ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!

पाहा व्हिडीओ

पाहा हेमांगीची पोस्ट :

संबंधित बातम्या :

“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, त्यांनी…” बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

((Marathi Actress Hemangi Kavi shares bold views in a Facebook Post on Bra and Women Trupti Desai slams her)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.