Rani Mukerji: राणी मुखर्जीचं मोठं वक्तव्य, मुल जन्माला घालण्यासाठी आता मी…, चर्चांना उधाण
Rani Mukerji: 'मुल जन्माला घालण्यासाठी आता मी...', प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे मोठं वक्तव्य, बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Rani Mukerji: अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज राणी बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली राणी खासगी आयुष्यात आनंदी आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने दुसऱ्या बाळाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. आजही अभिनेत्रीचं ते वक्तव्य चर्चेत आहे.
मुलाखतीत राणी म्हणाली होती, ‘माझी लेक आता आठ वर्षांची झाली आहे. जेव्हा माझी मुलगी दीड वर्षांची होती, तेव्हाच मी दुसऱ्या बाळाचा विचार केला होता. मुलीच्या जन्मानंतर मी दुसऱ्यांदा गरोदर राहण्यासाठी प्रयत्न केले. मी गरोदर देखील राहिले. पण माझं मिसकॅरेज झालं. मी माझं बाळ गमावलं होतं.’
मिसकॅरेज झाल्यानंतर राणी पूर्णपणे कोलमडली होती आणि तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. राणी मुखर्जी हिने दिग्दर्शक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांच्यासोबत 2014 मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर लेक अदीरा हिचं जगात स्वागत केलं.
दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल अभिनेत्री म्हणालेली, ‘2021 मध्ये मला गुडन्यूज मिळाली होती. मी दुसऱ्यांदा आई होणार होती. माझ्या प्रेग्नेंसीला पाच महिने देखील झाले होते. पण माझं मिसकॅरेज झालं. मी माझ्या मिसकॅरेजबद्दल कोणालाच काहीही सांगितलं नाही. कारण सांगितलं असतं तर, लोकांना वाटलं असतं की, सिनेमाच्या प्रमोशनसाठी सर्वकाही करत आहेत…’ असं देखील राणी म्हणाली होती.
राणी हिला आजही एका गोष्टीची खंत वाटते आणि ती म्हणजे, राणी लेक आदिरा हिला एक भाऊ किंवा बहीण देऊ शकली नाही… राणी म्हणालेली,’मी आता 46 वर्षांची झाली आहे आणि मुल जन्माला घालण्यासाठी हे माझं वय नाही…’ राणी तिच्या खासगी आयुष्यामुळे फार कमी चर्चेत असते.
आता राणी मुखर्जी 47 वर्षांची आहे आणि पती आदित्य चोप्रा तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे आहेत. आदित्य चोप्रा यांचं वय 54 वर्ष आहे. आदित्य यांच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. राणी ही आदित्य चोप्रा यांची दुसरी पत्नी आहे.
