Breakup Story | बॉबी देओलच्या प्रेमात वेडी झाली होती नीलम, ‘या’ कारणामुळे झालं होतं ब्रेकअप!

80 आणि 90च्या दशकात अभिनेत्री नीलम कोठारी हिने आपल्या सौंदर्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले. नीलमने आपल्या करिअरची सुरूवात 1984मध्ये ‘जवानी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर नीलमची गोविंदाबरोबर सुपरहिट जोडी बनली. जेव्हा, नीलम हळूहळू एक सुपरस्टार बनत होती, तेव्हा तिच्या हृदयात प्रेमाचे रोप फुलू लागले होते.

Breakup Story | बॉबी देओलच्या प्रेमात वेडी झाली होती नीलम, ‘या’ कारणामुळे झालं होतं ब्रेकअप!
नीलम आणि बॉबी

मुंबई : बॉलिवूडमध्ये बरेच सेलेब्रिटी एकमेकांच्या प्रेमात पडता आणि मग जीवन-मरणाच्या आणाभाकाही घेतात. परंतु, जेव्हा वेळ आपली किमया दाखवतो,  तेव्हा बर्‍याच जणांना त्यास सामोरे जावे लागते आणि मग ते कायमचे वेगळे होतात. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari) आणि बॉबी देओल (Bobby Deol). या दोघांच्या प्रेमाची चर्चा बर्‍याच बातम्या आणि मासिकांमधून रंगली होती. परंतु, त्यांची ही प्रेमकथा पूर्ण होऊ शकली नाही (Bollywood actor Bobby Deol and Neelam Kothari breakup story).

80 आणि 90च्या दशकात अभिनेत्री नीलम कोठारी हिने आपल्या सौंदर्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले. नीलमने आपल्या करिअरची सुरूवात 1984मध्ये ‘जवानी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर नीलमची गोविंदाबरोबर सुपरहिट जोडी बनली. जेव्हा, नीलम हळूहळू एक सुपरस्टार बनत होती, तेव्हा तिच्या हृदयात प्रेमाचे रोप फुलू लागले होते.

कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नीलमच्या अभिनेता बॉबी देओलसोबत अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. असं म्हणतात की, त्यांचं हे नातं तब्बल 5 वर्षे टिकलं. नीलम आणि बॉबी दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, तरीही त्या दोघांच्या प्रेमकथेचा शेवट झाला होता.

अशी सुरु झाली दोघांची लव्हस्टोरी

त्यावेळी आलेल्या वृत्तानुसार, बॉबी बहुतेक वेळेस भाऊ सनी देओलचे शूटिंग पाहण्यासाठी सेटवर जात असे. तिथेच त्याची भेट नीलमसोबत झाली. पहिल्याच नजरेत त्याचे नीलमवर प्रेम बसले. नीलम सनीसोबत अनेक हिट चित्रपटात काम करत होती. सनीच्या एका चित्रपटाच्या सेटवर नीलम आणि बॉबीची मैत्री झाली होती. त्यानंतर, त्यांची ही मैत्री पुढे प्रेमात बदलली (Bollywood actor Bobby Deol and Neelam Kothari breakup story).

बराच काळ चालली ही प्रेमकथा

नीलम आणि बॉबी, अगदी मनापासून एकमेकांवर प्रेम करत होते,  एकमेकांसोबतच्या नात्याविषयी गंभीर देखील होते. असं म्हणतात की, दोघांनाही लग्न करायचं होतं. पण, 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर एक दिवस अचानक त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावेळी असे बोलले गेले होते की, धर्मेंद्रमुळे नीलम आणि बॉबीचा ब्रेकअप झाला होता. धर्मेंद्र यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. मात्र, नीलमने ही सगळी वृत्त फेटाळून लावली.

अशाप्रकारे तुटले नाते

नीलमने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी आणि बॉबी आता विभक्त झालो, हे खरे आहे. फक्त मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलायला आवडत नाही. परंतु, आमच्या नात्याविषयी चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही परस्पर संमतीने विभक्त आहोत, असे अभिनेत्रीने म्हटले होते. धर्मेंद्र किंवा इतर कोणाचाच यात हात नाही. तिला फक्त असं वाटू लागलं होतं की, आता ती आणखी आनंदी राहू शकणार नाही, तिने बॉबीलाही ही गोष्ट सांगितली होती, त्यामुळे ते दोघेही वेगळे झाले.

याशिवाय नीलमने स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, त्यांच्या ब्रेकअपसाठी कोणीही जबाबदार नाही. बॉबी आणि तिने एकत्र मिळून ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा आमच्या मैत्रीवर परिणाम होनात नाही, असे देखील तिने म्हटले होते.

(Bollywood actor Bobby Deol and Neelam Kothari breakup story)

हेही वाचा :

Video | पुन्हा एकदा दिसला मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज, ‘पूल’मधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI