कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

इरफान खानची तब्येत अचनाक बिघडली (Irrfan Khan admitted in ICU due to Cancer). यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 28, 2020 | 4:55 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आज (28 एप्रिल) सकाळी त्याची तब्येत अचनाक बिघडली (Irrfan Khan admitted in ICU due to Cancer). यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला आहे. त्यावरच त्याचे उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा तयार होत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. दरम्यान, नुकतेच इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं. त्यावेळी लॉकडाऊनमुळे त्याला आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नसल्याचंही वृत्त होतं. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं. सध्या इरफान खान मुंबईत आहे.


2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. त्याने ट्विट करत म्हटले होते, “आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असंच काहीसं घडत आहे. मला न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

गेट वेल सून इरफान!

अभिनेता इरफान खानचं लवकरच पुनरागमन

दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतला

संबंधित व्हिडीओ:


Irrfan Khan admitted in ICU due to Cancer

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें