AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांच्यामुळे नातवाला आयुष्यभराचा फटका? थेट लागली वाट, जया स्पष्ट म्हणाल्या, माझ्या नातवाला…

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 2023 पासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. मात्र, त्याच्या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळत नाही. याला कारणीभूत आज्जी जया बच्चन असल्याचे सांगितले जाते. आता त्यावर स्पष्ट बोलताना जया बच्चन या दिसल्या आहेत.

जया बच्चन यांच्यामुळे नातवाला आयुष्यभराचा फटका? थेट लागली वाट, जया स्पष्ट म्हणाल्या, माझ्या नातवाला...
Jaya Bachchan and Agastya Nanda
| Updated on: Feb 26, 2026 | 11:16 AM
Share

बॉलिवूडमधील सर्वात टॉपचे घराणे कोणते असेल तर ते आज बच्चन फॅमिली आहे. अमिताभ बच्चन गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहेत. जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन असे कुटुंबातील सर्वच सदस्य बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहेत. आता बच्चन कुटुंबाची तिसरीही पिढी बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास सज्ज आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करतोय. मात्र, म्हणावे तसे यश त्याला अजिबातच मिळत नाहीये. अगस्त्य आजोबा, आज्जी, मामा आणि मामी सारखे बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमिताभ बच्चन स्वत: अगस्त्य नंदा याच्या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही दिसले. मात्र, अगस्त्यच्या चित्रपटांना अजिबात धमाका करता येत नाही. याचा दोष थेट जया बच्चन यांना दिला जात आहे. जया बच्चन यांच्या स्वभावाला फटका अगस्त्यला बसल्याचे बोलले जात आहे, त्यावरच आता जया बच्चन स्पष्ट बोलताना दिसल्या.

जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच पापाराझींबद्दल धक्कादायक विधान केले होते, ज्यानंतर संतापाचे वातावरण झाले. थेट पापाराझींच्या पॅन्टबद्दल त्यांनी भाष्य केले. मात्र जया बच्चन यांचे हे बोलणे कोणालाही पटले नाही. जया बच्चन यांचे पापाराझींसोबतच्या वागण्यामुळे अगस्त्य नंदा याच्या करिअरवर वाईट परिणाम झाल्याचे बोलले जाते.

2023 मध्ये द आर्चीज चित्रपटाच्या माध्यमातून अगस्त्य याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 2026 मध्ये त्याचा इक्कीस चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, अगस्त्य नंदाच्या दोन्ही चित्रपटांना धमाल करण्यात यश मिळाले नाही. आता अशी चर्चा सुरू आहे की, जया बच्चन यांच्या स्वभावाचा आणि लोकांसोबतच्या व्यवहाराचा परिणाम अगस्त्य नंदा याच्या करिअरवर होत आहे.

यावर जया बच्चन यांनी स्पष्टपणे आता भाष्य केले. जया बच्चन यांनी म्हटले की, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती माझ्या नातवाचे भाग्य बदलू शकत नाही. अगस्त्य स्टार बनणार आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत म्हटले की, ते स्टारडमच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांना जवळजवळ 15 वर्षे प्रेसने बंदी घातली होती, त्याचा काही परिणाम त्यांच्या करिअरवर झाला? जया बच्चन यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पापाराझींसोबत असलेल्या नात्याचा अगस्त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुळात म्हणजे अगस्त्याचे प्रेससोबत वेगळे नाते आहे.

Follow Us
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?