AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिने माझा हात मागून जोरात ओढला आणि पुढे…,विकी कौशल याचा धक्कादायक खुलासा

विकी कौशल याचा नुकताच सॅम बहादूर हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विकी कौशल हा सॅम बहादूर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. या चित्रपटाची ओपनिंगही जबरदस्त ठरली आहे. नुकताच विकीने मोठा खुलासा केलाय.

तिने माझा हात मागून जोरात ओढला आणि पुढे...,विकी कौशल याचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Dec 02, 2023 | 3:12 PM
Share

मुंबई : विकी काैशल हा त्याचा सॅम बहादूर या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विकी काैशल याचा हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसतोय. नुकताच आता विकी काैशल याने थेट पत्नी कतरिना कैफ हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. कतरिना कैफ हिचे काही राज उघडे करताना विकी दिलाय. विकी काैशल म्हणाला की, मी काय कपडे घालायचे आणि काय नाही हे सर्वकाही कतरिना कैफ हिच ठरवते. मला अनेकदा कपड्यांमुळे तिचा ओरडा खावा लागलाय. विकी काैशल याने थेट कतरिना कैफ हिच्याबद्दल अजून एक मोठा खुलासा केला.

विकी काैशल म्हणाला की, मी एकदा बाहेर निघालो होतो…मात्र, अचानक कतरिना कैफ हिने माझा हात पकडून मला मागे ओढले. कतरिनाने मला स्पष्ट सांगितले की, मी तुला बाहेर जाऊ देणार नाहीये. मी तिला म्हटले की, यामध्ये काय वाईट आहे, तिने थेट म्हटले सर्वकाही…शेवटी मी तिला ठिक आहे म्हणत कपडे बदलून बाहेर गेलो.

मुळात म्हणजे कतरिना कैफ ही माझ्या तोंडावरच माझ्या कपड्यांना वाईट म्हणते. पुढे विकी म्हणाला, तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाली की, ती खूप जास्त मेहनत करते. ती नेहमीच डाएटवर लक्ष देते. खरोखरच ती खूप जास्त मेहनत घेते. सर्व गोष्टी तिला तिच्या याच मेहनतीमुळे मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी कतरिना पोहचली.

कतरिना कैफ हिने मोठा खुलासा करत सांगितले होते की, एकाच घरात असूनही माझी आणि विकीची भेट होत नाही. तो त्याच्या चित्रपटात बिझी आहे आणि मी माझ्या चित्रपटात. नशीब की आम्ही दिवाळी एकसोबत साजरी केली. पुढे कतरिना म्हणाली, असे नाही की, आम्ही एकमेकांना मिस करत नाहीत. तो आणि मी एकमेकांना मिस करतो.

विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्याबद्दल केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विकी काैशल याच्या सॅम बहादूर या चित्रपटाने मोठा धमाका नक्कीच केलाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विकी काैशल हा दिसला. आता पुढील काही दिवसांमध्ये हा चित्रपट कमाईमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...