ऐश्वर्या राय हिचा तो व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का, उदास चेहरा, डोळ्यात अश्रू अभिनेत्री थेट…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय बऱ्याचदा बच्चन कुटुंबियांसोबत अनेक ठिकाणी दिसत नाही. हेच नाही तर विदेशातही ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत एकटीच जाताना दिसते. अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी झाले. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन पोहोचले होते. नुकताच धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांकडून मुंबईत प्रार्थना सभा आयोजित केली होती. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री यावेळी उपस्थित होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या सभेला पोहोचली. यावेळी बच्चन कुटुंबियांपैकी अभिनेत्रीसोबत दुसरे कोणीही नव्हते. ऐश्वर्या प्रार्थना सभेतील बाहेर पडताना स्पॉट झाली. यादरम्यानचा तिचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेतून बाहेर पडताना ऐश्वर्याला आपल्या डोळ्यातील अश्रू लपवणे कठीण झाले. चेहरा लपवताना ऐश्वर्या दिसली. आपल्या चेहऱ्यावरील तणाव आणि अश्रू लपवताना ऐश्वर्या दिसली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऐश्वर्याचा बॉडीगार्ड पापाराझींना दूर जाण्यास सांगताना दिसतोय. मागे ऐश्वर्या बसल्याचे दिसत आहे. ऐश्वर्या राय हिने दुसऱ्या बाजूला बघून आपला चेहरा लपवला. तिचे केस चेहऱ्यावर आली. ऐश्वर्या डोळ्यातील अश्रू लपवत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणतात की अभिनेत्रीला तिचा चेहरा लपवण्याची गरज नाही. कॅमेरा बघताच ऐश्वर्या राय ही दुसरीकडे चेहरा करताना दिसली. सुरूवातीला ऐश्वर्या राय हिची गाडी बघितल्यावर अंदाज लावला गेला की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघेही प्रार्थना सभेला पोहोचले होते. मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, ऐश्वर्या राय ही एकटीच सभेला पोहोचली.
View this post on Instagram
ऐश्वर्या रायसह प्रार्थना सभेला बरेच बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. देओल कुटुंबाकडून ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी या उपस्थित नव्हत्या. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या जाण्याने दु:खी आहेत. त्या सोशल मीडियावर सातत्याने फोटो शेअर करताना दिसत आहेत.
