अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय हिचा जळफळाट, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, चेहऱ्यावर राग आणि हातवारे करत…

Aishwarya Rai Video : अनंत अंबानी याच्या लग्नाची चर्चा फक्त देशातच नाहीतर विदेशातही सुरू आहे. विदेशातून अनेक पाहुणे या लग्नासाठी भारतात दाखल झाले. आता या लग्नातील विविध फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये ऐश्वर्या राय हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय हिचा जळफळाट, तो व्हिडीओ व्हायरल, चेहऱ्यावर राग आणि हातवारे करत...
Aishwarya Rai
| Updated on: Jul 17, 2024 | 11:47 AM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेट केले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले. 2007 मध्ये ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी देखील आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्यात वाद सुरू असून ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. नेहमीच दोघे एखाद्या पुरस्कार सोहळ्यात देखील सहभागी झाले तरीही ते वेगवेगळ्या गाड्यांनी पोहोचतात. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबाकडून काहीच भाष्य करण्यात नाही आले, ऐश्वर्या आणि अभिषेकने यावर बोलणे टाळलेच आहे.

नुकताच ऐश्वर्या राय ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीला पोहोचली होती. यावेळी बच्चन कुटुंबासोबत नव्हेतर मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत ती आशिर्वाद सेरेमनी पोहोचली. यावेळी फोटोसाठी जबरदस्त पोझ देतानाही ऐश्वर्या राय ही दिसली. ऐश्वर्या राय ही यावेळी सुंदर अशा लूकमध्ये पोहोचली होती.

आता आशिर्वाद सेरेमनीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. चक्क अनंत अंबानी याच्या आशिर्वाद सेरेमनीमध्ये भडकताना ऐश्वर्या राय ही दिसली आहे. रागात कोणालातरी बोलताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. हेच नाहीतर ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसतोय. हातवारे करतानाही या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत आहे.

त्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये परत चेहऱ्यावर स्माईल देत फोटोसाठी पोझ देताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. मात्र, ऐश्वर्या राय ही नेमकी कोणावर भडकली हे अजूनही कळू शकले नाहीये. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, अखेर इतके जास्त भडकण्यास ऐश्वर्या राय हिला काय झाले. मात्र, हे समजू शकले नाहीये की, ऐश्वर्या राय ही नेमकी कोणावर भडास काढत आहे.