या बॉलिवूड अभिनेत्रीने खऱ्या गँगस्टरसोबत चित्रपटात काम केल आहे; त्याच्यावर 20 जणांची हत्या केल्याचा आरोप
चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका अभिनेत्रीसोबत फार विचित्र प्रसंग घडला होता. ज्याची कल्पना तिला स्वत:ला देखील नव्हती. बॉलिवूड अभिनेत्रीला चक्क एका खऱ्या गँगस्टरसोबत काम करावं लागलं होतं. त्या व्यक्तीवर चक्क 20 पेक्षा जास्त जणांचा खून केल्याचा आरोप होता. कोणती होती ती बॉलिवूड अभिनेत्री माहितीये?

बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत असे अनेक विचित्र किस्से घडतात जे कदाचित त्यांनाही अपेक्षित नसतात. असाच एक प्रसंग एका अभिनेत्रीसोबत घडला होता. या अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात एका गँगस्टरसोबत काम करावं लागलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर 20 जणांच्या खूनांचा आरोप होता. पहिल्याच भेटीत या गुन्हेगाराला पाहून अभिनेत्रीचा श्वास रोखला गेला होता.
खऱ्या गुंडासोबत काम करावं लागलं
या बॉलिवूडमधील अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ही अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती स्टार हिरोईन बनली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. पण हे फार कमी जणांना माहित असेल की भाग्यश्रीला एका चित्रपटात खऱ्या गुंडासोबत काम करावं लागलं होतं. त्या व्यक्तीवर 20 हून अधिक खूनांचा आरोप होता.
गुंडासोबत काम करण्याची खूप भीती वाटत होती,
एका मुलाखतीत भाग्यश्रीने सांगितले होते की तिला त्या गुंडासोबत काम करण्याची खूप भीती वाटत होती, पण जेव्हा ती सेटवर त्या गुन्हेगाराला भेटली तेव्हा तिची भीती हळूहळू कमी झाली. भाग्यश्रीने सांगितले की, ‘एका तेलुगू चित्रपटात मी एका खऱ्या गुन्हेगारासोबत काम केले होते आणि शूटिंग दरम्यान मी खूप घाबरले होते.’
गुन्हेगाराला चित्रपटाच्या शुटींगसाठी तुरुंगातून बाहेर आणण्यात आलं होतं
ती म्हणाली, ‘सरकारकडून परवानगी घेतल्यानंतर, या गुन्हेगाराला चित्रपटाच्या शुटींगसाठी तुरुंगातून बाहेर आणण्यात आले. चित्रपटाची कथा या गुन्हेगाराच्या वैयक्तिक जीवनातून प्रेरित होती. भाग्यश्री म्हणाली की तिचे पात्र एका पत्रकाराचे होते जी या गुन्हेगाराला भेटते .या चित्रपटातून तिला असा संदेश द्यायचा होता की गुन्हेगार बनणारा प्रत्येक माणूस जन्मतःच असा नसतो, परिस्थिती माणसाला बदलू शकते.’
View this post on Instagram
20 ते 30 लोकांची हत्या केली होती
भाग्यश्रीने सांगितले की चित्रपटाची संकल्पना अनोखी होती, त्यामुळे ती त्याबद्दल खूप उत्साहित होती, पण जेव्हा तिला कळले की सेटवर एक गुंड येणार आहे, तेव्हा ती घाबरली. ती म्हणाली, ‘मी शूटिंगसाठी सेटवर पोहोचले आणि एक दिवशी मी बसले असताना कोणीतरी आलं आणि म्हणालं – गँगस्टर भाई शूटिंगसाठी येत आहे. त्याने सुमारे 20 ते 30 लोकांची हत्या केली आहे.’
‘तो गुंड येताच, त्याला पाहून मी थक्क झाले’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तो गुंड येताच, त्याला पाहून मी थक्क झाले. त्याने भगवे रंगाचे कपडे घातले होते, त्याच्या गळ्यात अनेक साखळ्या होत्या आणि त्याच्यासोबत 10 ते 12 अंगरक्षक होते. तो आला, बसला आणि मला म्हणाला की त्याला मी खूप आवडते. हे ऐकून माझा श्वासच थांबला. मी विचार केला की आता काय होईल?’ यानंतर भाग्यश्रीने सांगितले की, नंतर जेव्हा गुन्हेगाराने सांगितले की त्याची बहीणही तिच्यासारखीच दिसते तेव्हा तिला दिलासा मिळाला.
