जान्हवी कपूर हिचा भडका, थेट सुनावले… अभिनेत्रीने म्हटले हा तर सामूहिक…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. जान्हवी कपूर शिखर पहाडिया याला डेट करत आहे. नुकताच जान्हवी कपूर हिने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री चांगलीच भडकल्याचे बघायला मिळत आहे.

बांगलादेशात सध्या हिंदू लोकांवर अत्याचार सुरू आहेत. दीपू नावाच्या मुलाची थेट हत्या करण्यात आली. बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू असून हिंदू लोक टार्गेटवर आहेत. दीपूला काही कट्टरपंथींनी ठार केले. यासोबतच भारतीय दूतावासाच्या कार्यालयावरही दगडफेक केली जात आहे. हिंदू लोकांवर होणाऱ्या अन्यायानंतर भारतात संताप बघायला मिळत आहे. हेच नाही तर दिल्लीतील बांगलादेश दूतावास कार्यालयाबाहेर हिंदू संघटनांनी आंदोलन केले. आता बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बांगलादेशात हिंदू लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लिहिले आहे. जान्हवी कपूर हिची पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिने बांगलादेशातील घटनेला ‘सामूहिक हत्याकांड’ म्हटले आहे.
जान्हवी कपूर हिने इंस्टास्टोरीवर पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जान्हवी कपूर हिने लिहिले की, बांगलादेशात जे घडत आहे ते क्रूर आहे. हे एक सामूहिक हत्याकांड आहे. ही काही एकमेव घटना नक्कीच नाहीये. जर तुम्हाला या अमानुष सार्वजनिक मारहाणीबद्दल माहिती नसेल, तर कृपया त्याबद्दल येथे वाचा, व्हिडीओ पाहा आणि माहिती घ्या…
प्रश्न विचारा आणि या सगळ्यानंतरही तुम्हाला राग येत नसेल तर हा दुटप्पीपणा आपल्याला संपवून टाकेल. त्यापूर्वीच आपल्याला समजले पाहिजे. पुढे जान्हवी कपूर हिने म्हटले की, आपण जगाच्या दुसऱ्या बाजूला घडणाऱ्या घटनांवर रडत राहू तर दुसरीकडे आपलेच भाऊ आणि बहिणींना जिवंत जाळले जात आहेत.. कोणत्याही स्वरूपातील अतिरेकीपणाचा निषेध केला पाहिजे आणि आपली माणुसकी नष्ट होण्यापूर्वी.

जान्हवी कपूर हिने केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टनंतर जान्हवी कपूर हिचे काैतुक केले. जान्हवी स्पष्टपणे आपल्या मनातील राग काढताना दिसली. जान्हवी कपूरसोबतच अनेक कलाकारांनीही बांगलादेशातील घटनेचा निषेध केला. बांगलादेशात हिंदू तरूणाची सामूहिक हत्या करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा हिंदूवर होणारे अत्याचार चर्चेत आले असून बांगलादेशात हिंदू सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झालंय.
