PMC Election 2025 : एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ, भाजपने देऊ केल्या फक्त इतक्या जागा, पुण्यात युतीचं काय होणार?
PMC Election 2025 : भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली. शंभरहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती.

पुण्यात भाजप-शिवसेनेने युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण जागा वाटपाचा तिढा अजून सुटत नाहीय. महायुतीमध्ये 35 जागा मिळाव्यात यावर शिवसेना ठाम आहे. पुण्यात महायुतीमध्ये जागावाटप सन्मानाने व्हावी अशी अपेक्षा आहे. महायुतीमध्ये 35 ते 40 जागांवर ठाम राहणार असल्याची भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. पुण्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपने 125 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार शिवसेनेला एवढ्या जागा मिळणार का? हा प्रश्न उपस्थित होतो. पुणे महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 162 आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात भाजपने 97 जागा जिंकल्या होत्या. पुणे महापालिका निवडणुकी युती म्हणून लढवण्याचं निश्चित झाल्यानंतर ही शिवसेना आणि भाजप जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही.
शिवसेनेकडून 35 जागांची मागणी केली जात असताना भाजपकडून अवघ्या 15 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला आहे. शिवसेनेच्या काही अस्वस्थ कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली आहे. शिवसेनेचे 35 जागांची मागणी आहे, त्यावर भाजपने 15 जागा देऊ केल्या आहेत,मात्र आमची 25 ते 30 जागांची अपेक्षा आहे.
भाजप यादीवर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब
भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी काल रात्री उशिरा अंतिम करण्यात आली. शंभरहून अधिक नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस या यादीतील नावांना मान्यता देऊन आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात बुधवारी झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. या उमेदवारांच्या नावाची यादी घेऊन भाजपचे प्रमुख पदाधिकारी काल मुंबईला गेले होते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
अंतिम करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 41 प्रभागातील प्रमुख उमेदवारांनी यादी कोअर कमिटी बैठकीत तयार करण्यात आली होती. पुण्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवू शकतात. असं झाल्यास काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल.
