AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाती-धर्मावर आधारलेली इंडस्ट्री, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे…, बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

Bollywood: पितृसत्ताक इंडस्ट्रीमध्ये जाती-धर्मावर होतो भेदभाव, कोणी कुठे बसायच काय खायचं? सर्वकाही ठरलेलं असतं, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे..., बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

जाती-धर्मावर आधारलेली इंडस्ट्री, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे..., बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
| Updated on: Oct 12, 2024 | 12:04 PM
Share

बॉलिवूडमधील अनेक चांगल्या गोष्टी अनेकांना आकर्षित करत असतात. पण झगमगत्या विश्वातील काही धक्कादायक सत्य आणि रहस्य समोर आल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावतात. अनेक अभिनेत्री बॉलिवूडबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी सांगत असतात. आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने देखील बॉलिवूडचं मोठं सत्य समोर आणलं आहे. बॉलिवूडमध्ये देखील धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव होतो असा कोणी विचार देखील केला नसेल. इंडस्ट्री पितृसत्ताक असली तरी त्यात जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव केला जातो, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

कोंकणा म्हणाली की, हे लोक माणसाची जात आणि वर्ग ठरवतात, त्यांना कुठे बसायचे आणि कोणते पदार्थ खायला दिले पाहिजे हे देखील ठरवलं जातं… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कोंकणा हिने इंडस्ट्रीचं सत्य सांगितलं आहे. शिवाय इंडस्ट्रीमध्ये महिलांना कशी वागणूक मिळते? यावर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

कोंकणा म्हणाली, ‘इंजस्ट्रीमध्ये सर्वत्र भेदभाव केला जातो. माझ्या सांगण्याचा अर्थ म्हणजे खाण्यापिण्याबद्दल देखील याठिकाणी भेदभाव होतो. कोणी कुठे बसायला हवं. कोणाला कुठे बसण्याची परवानगी नाही? काय खायची परवानगी नाही? कोणाचा बाथरुम कुठे आहे?’

महिलांबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सेटवर फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान मिळतो. इतरांना एखाद्या फर्नीचर सारखी वागणूक दिली जाते. त्याना धक्के देखील जातात. अशा वातावरणात काम करणं प्रचंड कठीण असतं. कोणी कल्पना देखील करु शकत नाही की, इंडस्ट्रीमध्ये कोणत्या आणि कशा गोष्टींचा सामना करावा लागतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कोंकणा सेन शर्मा हिचं खासगी आयुष्य

कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. खासगी आयुष्यात देखील अभिनेत्रीने अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्रीने 2007 मध्ये रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये रहात होते. 2010 साली ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती, त्यानंतर रणवीर आणि कोकणा यांचे लग्न झालं.

लग्नानंतर कोंकणा हिने 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील कोंकणा – रणवीर नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा