तोच चेहरा, तेच हास्य, त्याच अदा… हुबेहूब ममता कुलकर्णीसारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी थक्क!
ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये गाजवलेला एक काळ... आता हुबेहूब अभिनेत्री सारख्या दिसणऱ्या तरुणीला पाहून व्हाल थक्क... तरुणीला पाहून नेटकरी थक्क!, सध्या सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल... चर्चांना उधाण...

‘करण अर्जुन’ शिवाय अभिनेत्रीने ‘छुपा रुस्तम’, ‘चाइना गेट’, ‘कभी तुम कभी हम’, ‘आशिक आवारा’ आणि ‘सबसे बडा खिलाडी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री कुठे आणि काय करते… याबद्दल फार कोणाला माहिती नाही. पण आता हुबेहूब ममता कुलकर्णी हिच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. काही जण म्हणत आहे ही तरुणी तर हुबेहूब ममता सारखी दिसत आहे, तर काही जण विरोध करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर ममता कुलकर्णीची डुप्लिकेट म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली तरुणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तरुणीचं नाव नेहा रॉय असं आहे. व्हिडीओमध्ये नेहा अभिनेता सलमान खान याच्या ‘हटा सावन की घटा’ गाण्यावर रिल तयार करताना दिसत आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, नेहाच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. ‘हुबेहूब ममतासारखी दिसते…’ असं अनेक नेटकरी कमेंट करत म्हणाले आहेत. तोच चेहरा, तेच हास्य, त्याच अदा…,’ अशी कमेंट देखील नेटकरी करत आहेत.
ममता कुलकर्मी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्रीच्या जोडीची तुफान चर्चा रंगली आहे. पण सलमान खानच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अचानक गायब झाल्या. ममता हिच्यासोबत देखील असंच काही झालं.
ममता कुलकर्णी हिचे संबंध थेट अंडरवर्ल्डसोबत असल्याचं समोर आलं. तेव्हापासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही. ममता कुलकर्णी हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण गँगस्टर विक्रम गोस्वामी याच्यासोबत ममता हिच्या नाव जोडलं जावू लागलं आणि सर्वत्र त्यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला.
एवढंच नाही तर, विक्रम गोस्वामी आणि ममता यांनी लग्न केल्याची देखील चर्चा रंगली. लग्नानंतर दोघे देश सोडून गेले. शिवाय अभिनेत्री ड्रग्स प्रकरणी तुरुंगातही गेली होती. गँगस्टर विक्रम गोस्वामी, इब्राहिम याचा गुंड होता.
