मुस्लीम पुरुषाशी लग्न… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रचंड यातना… घटस्फोटानंतर नाही दिला एकही रुपया
Bollywood Actress Life : दोन मुलांच्या जन्मानंतर मुस्लीम नवऱ्याने सोडली साथ... सासरच्या मंडळींनी देखील फिरवली पाठ... घटस्फोटानंतर नवऱ्याने नाही दिला एकही रुपया... आज कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री...

Bollywood Actress Life : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर अभिनयाला राम राम ठोकला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. पण अभिनेत्रींना वैवाहिक आयुष्यात देखील सुख मिळालं नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. मुस्लीम पुरुषाची लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय सोडला आणि दोन मुलांना जन्म दिला. पण दोन मुलांच्या जन्मानंतर नवऱ्याने साथ सोडली आणि घटस्फोटानंतर एकही रुपया पत्नी आणि मुलांसाठी दिला नाही.
एका मुलाखतीत अभिनेत्री लग्नानंतर आणि घटस्फोटानंतर तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटना सांगितल्या… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा बेदी आहे. पूजा हिने मुलाखतीत लग्न, घटस्फोट आणि आयुष्यातील धक्कादायक प्रसंगांबद्दल सांगितलं आहे.
मुलाखतीत पूजा म्हणाली, ‘मला प्रत्येक गोष्टीत 100 टक्के द्यायचं होतं… म्हणून लग्नानंतर मी अभिनय देखील सोडला आणि माझा पूर्व पती फरहान हा एका अतिशय रूढीवादी मुस्लिम कुटुंबातील होता आणि त्याच्या कुटुंबातील सून कधीही ‘सेक्सी अभिनेत्री’ होऊ शकत नाही. यावर अनेक वाद देखील झाले… दोन्ही कुटुंबियांकडून आमच्या लग्नासाठी नकार होता… कुटुंबियांमध्ये वाद नको म्हणून मी बॉलिवूड सोडलं आणि दुसरं काही करण्याचा निर्णय घेतला…’
सांगायचं झालं तर, 1994 मध्ये पूजा हिने फरहान फर्निचरवाला याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर मुलगा आणि मुलीला जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2003 मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण तो काळ पूजा हिच्यासाठी फार कठीण होता. कारण याच काळत तिच्या जवळच्या व्यक्तींनी अखेरचा श्वास घेतला.
पूजा म्हणाली, ‘मी 27 वर्षांची असेल तेव्हा माझ्या आजीचं कॅन्सरमुळे निधन झालं… माझ्या कुत्र्याचं देखील तेव्हा निधन झालं. माझी आई भूस्खलनात मरण पावली आणि माझ्या भावाने आत्महत्या केली. याच काळात माझा घटस्फोट देखील झाला आणि माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आली…’
‘तेव्हा मी फक्त 32 वर्षांची होती… प्रत्येक 6 महिन्यात माझ्यासोबत काही तरी वाईट होत होतं… त्याच वेळी मी कॉलम लिहियला सुरुवात केली… त्यानंतर गोष्टी हळू-हळू सुधारु लागल्या… एका वर्षाच्या आत, मी माझ्या पतीसोबतच मर्सिडीज चालवत होते. आमच्यात कोणतेही वैर किंवा राग नव्हता. मी त्याचा व्यवसाय सुरुवातीपासून उभारण्यास मदत केली, आणि तरीही मला त्यातून काहीही मिळालं नाही. मला ते स्वीकारावं लागलं.’
