AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीलम कोठारीच्या वैवाहिक आयुष्यात कलह, होणार घटस्फोट? पती म्हणाला, ‘सुंदर पत्नी हवी तर…’

Neelam Kothari Married Life: 'सुंदर पत्नी हवी तर...', नीलम कोठारी हिचा होणार घटस्फोट? नवऱ्याकडून मोठा खुलासा, नवऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण... नक्की काय आहे सत्य...

नीलम कोठारीच्या वैवाहिक आयुष्यात कलह, होणार घटस्फोट? पती म्हणाला, 'सुंदर पत्नी हवी तर...'
| Updated on: Jul 14, 2024 | 10:57 AM
Share

बॉलिवूडमध्ये घटस्फोट आता सामान्य गोष्ट आहे. आता अभिनेत्री नीलम कोठारी आणि अभिनेता समीर सोनी यांच्या घटस्फोटची चर्चा रंगली आहे. समीर सोनी आणि नीलम कोठारी हिच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान समीर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लग्नाबद्दल म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी समीर आणि नीलम यांचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अभिनेत्याच्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये नीलम आणि समीर यांचा वैवाहिक आयुष्याच्या चर्चा रंगू लागल्या. चर्चांनी जोर घरल्यानंतर समीर याने स्पष्टीकरण देत मोठं वक्तव्य केलं आहे. समीर याने आजचे कपल्स आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य करत, ‘आमच्या वैवाहिक आयुष्यात कोणतीच अडचण नसल्याचं’ स्पष्ट केलं आहे.

आजकालच्या जोडप्यांवर आणि लग्नाच्या पद्धतींवर निशाणा साधताना समीर म्हणाला, ‘जर तुम्हाला श्रीमंत नवरा हवा असेल तर, तुम्हाला सुंदर आणि आकर्षक असणं गरजेचं आहे. तुम्हाला सुंदर पत्नी हवी असेल तर, तुम्हाला पैसे कमवावे लागतील. जर तुम्हाला एक आनंदी आयुष्य हवं असेल तर, सहा महिने एकत्र राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा..’ अशी अभिनेत्याने पोस्ट केली.

लग्नाबद्दल केलेल्या पोस्टवर स्पष्टीकरण देत अभिनेता म्हणाला, ‘गेल्या 14 वर्षांपासून मी आणि नीलम विवाहित आहोत. आमच्या दोघांमध्ये काहीही वाईट सुरु नाहीये. सर्वकाही उत्तम आहे. मी स्वप्नात देखील नीलमबद्दल असा विचार करु शकत नाही. निराशेसाठी माफी मागतो. मी जे बोललो ते फक्त एक निरीक्षण आहे.’

View this post on Instagram

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

पुढे अभिनेता म्हणाला, ‘आजकाल हे सर्रास पाहायला मिळत आहे. तुम्हाला दिसेल की एका सुंदर स्त्रीचा नवरा दिसायला फारसा सुंदर नसून खूप श्रीमंत असतो. मी फक्त तुम्हाला सांगतोय की आजकाल हेच बघायला मिळतंय. बहुतेक लोकांसाठी, पैशामुळे सुरक्षिततेची भावना येते आणि त्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सध्या सर्वत्र समीर याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नीलम कोठारी – समीर सोनी यांचं नातं

प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी हिने देखील दोन लग्न केले आहेत. अभिनेत्रीने ऑक्टोबर 2000 मध्ये ऋषी सेठाई यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांचं बिनसलं आणि त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर नीलम हिने 2011 मध्ये अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतलं. तिचं नाव अहाना असं आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....