AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रुती हासन हिचा आई वडिलांबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, कधी ते दोघे..

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. नुकताच श्रुती हासन हिने एका मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. तिने लहानपण कसे गेले आणि घरातील गोष्टींवर भाष्य केले.

श्रुती हासन हिचा आई वडिलांबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, कधी ते दोघे..
Shruti Haasan
| Updated on: Feb 07, 2026 | 1:19 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि कमल हासन यांची लेक अभिनेत्री श्रुती हासन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. श्रुती हासन हिने फक्त तामिळ चित्रपटच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही मोठा धमाका केला. चित्रपटसृष्टीत एक वेगळे ओळख मिळवण्यात तिला यश मिळाले. वडिलांवर अवलंबून न राहता ती दिवसरात्र मेहनत करते. विशेष म्हणजे श्रुती हासनच्या चित्रपटांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. नुकताच एका मुलाखतीमध्ये श्रुती हासन ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली. हेच नाही तर तिने आपले बालपण नक्की कसे गेले आणि आई वडील विभक्त झाल्यानंतर काय परिणाम झाला यावरही खुलासा केला. यासोबतच आपल्या घरात देवाचे कोणतेही फोटो नाही याबद्दलही तिने भाष्य केले. श्रुती हासन हिच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगत आहे.

रणवीर अल्लाहबादियासोबत बोलताना श्रुती हासन हिने म्हटले की, लहानपणापासून ती तामिळ आणि हिंदी भाषेत वाढले. शेवटी मुलांवर आईचा प्रभाव हा अधिक असतो. आम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्येच जास्त बोलत. माझ्या आईला एक भीती होती की, मी हिंदी शिकणार नाही आणि फक्त तामिळ शिकेल. मी इंग्लीश मीडियाममध्ये जात असल्याने कुठेतरी माझी तामिळ कमजोर झाली.

ज्यावेळी आई वडील वेगळे झाले, त्यावेळी मी मुंबईला आले. माझे आई वडील कधीच माझ्या शाळेत आले नाहीत. नॉर्मल मुलांसारखे माझे लहानपण गेले नाही. पुढे बोलताना श्रुती हासन हिने म्हटले की, मुळात म्हणजे माझे कुटुंब धर्म जात आणि देवाला मानत नाही. आम्ही नास्तिक आहोत. धर्म नसलेल्या परिवारात वाढले.

जर तुम्ही पप्पांना ज्योतिषशास्त्राबद्दल बोललात तर ते तुम्हाला पळून जाण्यास सांगतील. ते खूप जास्त वास्तविक आहेत. ते कधीच देव देवतांवर विश्वास ठेवत नाहीत, असेही श्रुती हासन हिने म्हटले. श्रुती हासन हिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. श्रुती हासन हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

Follow Us
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.