सोनाक्षी सिन्हा हिचे प्रेग्नंसीबद्दल अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाली, हा मी प्रेग्नंट..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सोशल मीडियावरही सक्रिय दिसतंय. मागील काही दिवसांपासून सोनाक्षीच्या प्रेग्नंसीबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामध्येच तिने मोठे विधान केले.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. हेच नाही तर सोनाक्षीच्या लग्नाला तिचे दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते. सोनाक्षीने जहीरसोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली. सोशल मीडियावर सोनाक्षी कायमच पतीसोबतचे फोटो शेअर करते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर तिने जहीरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. जहीरसोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याची चर्चा रंगताना दिसली. हेच नाही तर सतत ती विदेशात दिसत असल्याने लोकांनी अंदाज लावला की, सोनाक्षी विदेशात शिफ्ट होणार. मागील काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीचीही जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. आता नुकताच चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल आणि प्रेग्नंसीबद्दल सोनाक्षीने मोठा खुलासा केला.
सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना सोनाक्षी सिन्हाने म्हटले की, मी ज्यावेळी प्रेग्नंट होईल, त्यावेळी सर्वात अगोदर मी जगाला सांगेल हा मी प्रेग्नंट आहे, शांत राहा. हेच नाही तर सोनाक्षीने स्पष्ट केले की, लग्नानंतरही ती अगोदरप्रमाणेच काम करत आहे. तिच्या आयुष्यात अजिबातच काही बदल झाला नाही. पुढे सोनाक्षीने म्हटले की, मी हा विचारही करू शकत नाही की, माझे लग्न झाले आणि मी आता काम करणार नाही.
हा साधा विचारही माझ्या मनात येत नाही. लग्न नक्कीच आयुष्यातील भाग आहे, पण कोणतेही लग्न आपल्या कामात अडथळा आणू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, जहीरसोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी चित्रपटांमध्ये काम करणार नाही. मात्र, आता त्यावर अगदी स्पष्टपणे बोलताना सोनाक्षी सिन्हा दिसली. ती अगोदर प्रमाणेच चित्रपटात काम करत असल्याचे तिने म्हटले.
लग्नानंतर तिच्या आयुष्यात काहीच बदल झाले नसल्याचेही सोनाक्षी सिन्हाने म्हटले. सोनाक्षी सिन्हा ही जहीर इक्बाल याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहते. यापूर्वी तिने खुलासा केला की, जहीरसोबत त्याच्या कुटुंबातच राहण्याचा निर्णय माझा आहे. जहीरने बाहेर राहायचे का? असे मला विचारले होते. मात्र, त्याला मी स्पष्ट शब्दात सांगितले की, तुला बाहेर राहायचे असेल तर राहा मी तर इथेच राहणार.
