बॉलिवूडमधील या जोडप्यांमध्ये आहे वयाचं खूपच अंतर, एक अभिनेता तर पत्नीपेक्षा 30 वर्षांनी मोठा
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध जोडप्यांमध्ये वयाचे मोठे अंतर असूनही त्यांच्याबद्दल चर्चा मात्र नेहमीच होत असतात. .तसेच या जोड्यांमध्ये वयाचंही खूप अंतर असलेलं पाहायला मिळतं. कोण आहेत या सेलिब्रिटी जोड्या चला जाणून घेऊयात.

बॉलीवूड जोडप्यांबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसत असते.मग त्यांचे चित्रपट असो किंवा मग त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो. सर्वांनाचा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुकता असते. बॉलिवूडमधील काही जोड्याची चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेलं वयातील अतंर. बॉलिवूडच्या अशाच 10 प्रसिद्ध जोड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्यात अभिनेत्री या त्यांच्या सुपरस्टार पतीपेक्षा खूपच लहान आहेत. या यादीत एक जोडपं असंही आहे की अभिनेता त्याच्या पत्नीपेक्षा चक्क 30 वर्षांनी मोठा आहे.
तर या सेलिब्रिटी जोडीमधली पहिली जोडी आहे,
शाहिद आणि मीरा राजपूतची
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या वयात खूप अंतर आहे. मीरा शाहिदपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. पण त्यांना पाहून असे वाटते की ते दोघेही एक परिपूर्ण जोडपे आहे. दोघांमध्ये वेगळं बाँडिंग दिसून येतं. शाहिद अनेक प्रसंगी मीराचे कौतुक करतानाही दिसतो.
करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या वयात सुमारे 10 वर्षांचा फरक आहे. 2007 मध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. 2012 मध्ये करीना-सैफचे लग्न झाले, जे खूप चर्चेत होते. कारण त्यावेळी सैफ घटस्फोटित होता आणि 2 मुलांचा पिताही होता. आता सैफला आणि करीनाला 2 मुलं आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 2022 मध्ये लग्न केल. पण त्याआधी दोघांनीही अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं. पण दोघांमध्ये वयाचेही मोठं अंतर आहे. रणबीर आलियापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. पण तरीही त्यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर आणि पडद्याबाहेर स्पष्टपणे दिसून येते. ते बी टाऊनमधील एक रोमँटीक कपल असल्याचं म्हटलं जातं.
मान्यता दत्त आणि संजय दत्त
मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. संजय मान्यतापेक्षा 19 वर्षांनी मोठा आहे पण तरीही त्यांच्यात प्रेमाची कमतरता नाही. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. एवढेच नाही तर मान्यता प्रत्येक वाईट काळात संजय दत्तसोबत उभी राहताना दिसली आहे.
कबीर बेदी आणि अभिनेत्री परवीन दोसांझ
वयात सर्वात जास्त फरक असलेली जोडी म्हणजे कबीर बेदी आणि अभिनेत्री परवीन दोसांझ यांची. चार वेळा लग्न केलेले कबीर बेदी हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी चौथे लग्न ब्रिटिश वंशाची अभिनेत्री परवीन दोसांझशी केलं आहे. जी त्यांच्यापेक्षा पाच किंवा दहा नाही तर तब्बल 30 वर्षांनी लहान आहे. त्यांचे चौथे लग्न परवीन दोसांझशी झाले आहे.
