हिरोला नग्न दाखवू शकत नाही म्हणून अभिनेत्रींना… प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडची पोलखोल केली तेव्हा…
मोठ्या पडद्यावर सेक्स... शारीरिक संबंधांचा अभिनेत्रीने केलेला विरोध... म्हणालेली, 'हिरोला नग्न दाखवू शकत नाही म्हणून अभिनेत्रींना...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

बॉलिवूडमध्ये महिलांचं होणारं शोषण आणि वस्तुनिष्ठीकरण यावर चर्चा होण्यापूर्वीत दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिने या विचारसरणीचा आणि व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्या काळात मोठ्या पडद्यावर फक्त ग्लॅमर आणि शारीरिक संबंध दाखवत महिलांचा केवळ मार्केटिंग साधन म्हणून वापर केला जात होता.. त्यावर स्मिता हिने विरोध केलेला. स्मिता पाटील हिने कधीच सजावटी भूमिका केल्या नाहीत. तिने वास्तविक जीवन, संघर्ष आणि भावनांवर आधारित सिनेमे करण्यास प्राधान्य दिलं. ‘मानथन’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘मिर्चमसाला’ यांसारख्या सिनेमात स्मिता हिने महत्त्वाची भूमिका बजावली… महिलांना केवळ सौंदर्याबद्दल नाही तर बलवान, स्वतंत्र आणि धाडसी म्हणून दाखवण्याचा अभिनेत्रीने कायम प्रयत्न केला. स्मिता पडद्याबाहेरही तितकीच निर्भय होती.
एका मुलाखतीत स्मिता पाटील हिने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘हिरोला नग्न दाखवू शकत नाही, त्याने काही होणार नाही. पण महिलांना नग्न दाखवलं तर सिनेमा पाहण्यासाठी आणखी शंभर लोकांची गर्दी होईल. भारतातील प्रेक्षकांवर ही गोष्ट थोपवण्यातआ ली… सिनेमात सेक्स, अर्ध नग्न शरीर असेल तर तिम्ही सिनेमा पाहण्यासाठी याल.. ही विचारसरणी फार चुकीची आहे… जर सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, खऱ्या मनाने एकाच गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे… फक्त अशा पोस्टरमुळे सिनेमे चालत नाहीत…’ असं देखील स्मिता पाटील म्हणालेली.
स्मिताने केवळ सिनेमा निर्मात्यांनाच नव्हे तर समाजातील प्रचलित विचारसरणीलाही आव्हान दिलं, ज्यांचा असा विश्वास होता की लोक केवळ महिलांच्या लैंगिक प्रतिमा पाहूनच प्रेक्षक आकर्षित होतात. अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलेलं की, पुरुषांसोबत असं कधीच घडत नाही, हा दुहेरी निकष आहे.
सांगायचं झालं तर, स्मिता पाटील हिने फार कमी कळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण बॉलिवूड विश्वातील त्यांचा प्रवास फार लवकर संपला. वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांचं निधन झालं. 13 डिसेंबर 1986 मध्ये स्मिता हिने अखेरचा श्वास घेतला. स्मिता पाटील हिच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी हादरली आणि आजही ती पोकळी जाणवते. तरीही, अभिनेत्रीचं धाडस, आवाज आणि चित्रपटसृष्टीतील योगदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असते.
