Paparazzi Culture: सेलिब्रिटींच्या एकेका फोटोमागे बक्कळ पैसा.. ‘पापाराझी कल्चर’ म्हणजे काय रे भाऊ?
जिम, रेस्टॉरंट, सलून, पब, एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करणाऱ्या 'पापाराझीं'चं महत्त्व हल्ली खूप वाढलंय. हे पापाराझी कसं काम करतात, त्यामागे आर्थिक गणित काय, सेलिब्रिटींशी त्यांच नातं कसं आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

सेलिब्रिटी म्हटलं की त्या व्यक्तीच्या भोवती असामान्यतेचं मोठं वलय आपोआप निर्माण होतं. सोप्या शब्दांत बोलायचं झालं तर सर्वसामान्यांच्या हाती न लागणारे, सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगणारे आणि मुख्यत: त्यांच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीविषयी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल असणं. एक काळ असा होता, जेव्हा या सेलिब्रिटींचा एक फोटो मिळवण्यासाठी किंवा त्यांचे खास फोटोशूट पाहण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांना पैसे खर्च करावे लागायचे. प्रसिद्ध मॅगझिन, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्येच त्यांचे खास फोटो पहायला मिळायचे. मग चाहते त्याचीच कात्रणं स्वत:कडे जपून ठेवायचे. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी मग फोटोग्राफर्सची डिमांड वाढत गेली. इंडस्ट्रीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच फ्रिलान्स फोटोग्राफर होते, जे सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करायचे आणि त्या फोटोंना खूप मागणी असायची. बॉलिवूड सेलिब्रिटींची क्रेझ केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड होती, किंबहुना अजूनही आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधून जेव्हा कोणी ठराविक दिवसांसाठी भारतात यायचे, तेव्हा ते आवर्जून अशा फ्रिलान्स फोटोग्राफर्सकडून पैसे देऊन शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रिटींचे फोटो विकत घ्यायचे....
