AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग चर्चेचा विषय राहिले आहेत. ७० आणि ८० च्या दशकात अनेक दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे त्यांचे संसार मोडले.

लग्नानंतर बॉलिवूडमधील 'या' दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार
Bollywood Stars Extra Marital Affairs
| Updated on: Nov 08, 2024 | 12:08 PM
Share

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हंटल की सर्वात जास्त चर्चा होते ती त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची. पण हे फक्त आताच्या सेलिब्रिटींबद्दल आहे अस नाही तर हे 70s आणि 80s च्या सेलिब्रिटींबद्दलही चर्चा झालेल्या आहेत. जसं आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या आणि अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्री निम्रत कौर यांच्या अफेअर च्या चर्चा सुरु आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत राहिली आहे. तसेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे त्यांचं लग्न मोडलं आहे.

या अभिनेत्यांचे होते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

70s and 80s च म्हंटल तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअर बद्दलची चर्चा. लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा यांचे अनेक वर्षे रीना रॉयसोबत अफेअर असल्याचे म्हटले जायचे तसेच याबद्दल त्यांच्या पत्नीलाही माहित होतं . पण, काही वर्षानंतर त्यांचं आणि रिनाचं नातं तुटल्याचे म्हंटलं जातं.

त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी 1985 मध्ये योगिता बालीसोबत पहिलं लग्न केलं, पण याच दरम्यान त्यांचे श्रीदेवी सोबत नाव जोडलं गेलं. याच दरम्यान श्रीदेवी यांना मिथुनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नसल्याचे समजले. त्यानंतर श्रीदेवीने 1988 मध्ये या नात्याला पूर्णविराम दिला.

अफेअर्सच्या चर्चामध्ये सनी देओल ही मागे नव्हते. लग्न झालेलं असतानाही सनी देओल त्यांच्या कोस्टार अमृता सिंहच्या प्रेमात पडला, पण जेव्हा अमृताला त्याच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा तिने माघार घेतली. यानंतर त्याचं नाव डिंपल कपाडियाशी जोडले गेलं. रवीना टंडन आणि सनी देओलच्या लग्नाच्याही चर्चा होत्या रंगल्या होत्या. पण या चर्चा तेवढ्या प्रकर्षाने बाहेर आल्या नाहीत.

त्यानंतर आमिर खानने त्याची बालपणीची मैत्रीण रीनाशी लग्न केलं. यानंतर आमिर लगानची सहाय्यक दिग्दर्शक किरण रावच्या प्रेमात पडला आणि त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

राज बब्बर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. मात्र. लग्न झाल्यानंतर अभिनेत्री नंदिरा जहीरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याच्या चर्चा होत्या. मात्र पहिल्या मुलाच्या जन्मानंत नंदिरा बब्बरचा मृत्यू झाला त्यानंतर राज बब्बर त्यांच्या पहिल्या पत्नीकडे परत आले.

अमिताभ बच्चन यांचं नाव तर या यादीत प्रामुख्याने येत कारण, त्याचं आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा अगदी आजही होतात आणि त्याकाळात ते तेवढ वादग्रस्तही राहील.

अभिनेता धर्मेंद्र यांचं प्रकाश कौरशी लग्न झालं होतं. लग्नानंतर धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आणि त्यांना लग्नही करायचे होते . मात्र धर्मेंद्रची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट देण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी धर्म बदलून हेमाशी लग्न केलं.

त्यानंतर एका अफेअरमुळे सर्वच बॉलीवूडला धक्का बसला होता. ते म्हणजे राज कपूर आणि नर्गिस यांचे नाते. अभिनेत्याने आपल्या पत्नीसोबत निष्ठा दाखवत अभिनेत्रीशी लग्न करण्यास नकार दिला आणि नंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

अभिनेता आणि दिग्दर्शक संजय खानने 1966 मध्ये जरीन खानशी लग्न केले आणि दोघांना चार मुले आहेत. पण त्यांचे मन झीनत अमानवर जडलं. एका बॉलिवूड पार्टीत संजयने पत्नी जरीनसोबत मिळून झीनतला बेदम मारहाण केल्याचे म्हटल जातं. यानंतर हे नातं कायमच तुटलं.

दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सायरा बानो यांच्याशी लग्न केले आणि याच काळात त्यांचे अस्मा नावाच्या एका पाकिस्तानी महिलेशी अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.

s

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.