AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार!

आज (22 मार्च) 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यामध्ये दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि श्रद्धा कपूर अभिनित 'छिछोरे' (Chhichhore) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे'ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार!
छिछोरे
| Updated on: Mar 22, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : आज (22 मार्च) 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यामध्ये दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘छिछोरे’ (Chhichhore) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज झाला होता, जो प्रेक्षकांना खूपच आवडला होता. श्रद्धा आणि सुशांतशिवाय या चित्रपटात वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांच्यासोबत आणखी अनेक कलाकार होते (67th National Film Awards Sushant Singh Rajput film Chhichhore awarded as best hindi film).

यावर्षी ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, पण या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी या जगाचा निरोप घेऊन गेला आहे. त्याने आत्महत्या केल्यानंतर बरीच खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येची अनेक कारणे माध्यमांतून समोर आली होती, त्यातील एक कारण म्हणजे त्याच्या चित्रपटांना प्रोत्साहन न मिळणे, हे देखील होते. कारण, गेल्यावर्षी ‘छिछोरे’ चित्रपटाला कोणताही पुरस्कार देण्यात आला नव्हता. तर, ‘गल्ली बॉय’सारख्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर या गोष्टी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.

‘छिछोरे’साठी सुशांतच कौतुक!

(67th National Film Awards Sushant Singh Rajput film Chhichhore awarded as best hindi film)

सप्टेंबर 2019मध्ये प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा चित्रपट सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुकंही करण्यात आलं होतं.

‘छिछोरे’ हा एक अत्यंत सकारात्मक सिनेमा होता. “आत्महत्येविरोधात युद्ध” अशी या सिनेमाची थीम लाईन होती. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे खरंच धक्कादायक आहे.

या चित्रपटात सुशांत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला पुन्हा जीवनाचा अर्थ समजावून सांगतो. जीवन किती मौल्यवान असतं, हे या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याने केला होता (Sushant Singh Rajput Chhichhore).

काय आहे चित्रपटाची कथा?

‘छिछोरे’ हा चित्रपट अशा मुलाची कहाणी आहे, जो इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. तो एका उंच इमारतीवरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा जीव वाचतो, पण त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. तेव्हा डॉक्टर त्याच्या पालकांना म्हणजेच अन्नी (सुशांत सिंग राजपूत) आणि माया (श्रद्धा कपूर) यांना सांगतात की त्याची परिस्थिती नाजूक आहे. आम्ही त्याला वाचवू शकतो, पण त्याला जगण्याची इच्छाच नाही.

हे ऐकल्यानंतर अन्नी आपल्या मुलाला पुन्हा जीवन जगण्याची एक उमेद देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्याला त्याची आणि त्याच्या 5 ‘लूझर’ मित्रांची कहाणी सांगतो. हे सर्व ऐकल्यावर अन्नीच्या मुलामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होते. या सिनेमात अन्नी त्याच्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्यात यशस्वी झाला. मात्र, खऱ्या आयुष्यात तो स्वत:ला नैराश्यातून बाहेर काढू शकला नाही.

‘छिछोरे’मधील गाजलेला डायलॉग

“हम हार-जित, स्कसेस-फेल्युअर में इतना उलझ गये हैं की जिंदगी जिना भूल गये… जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इम्पॉर्टंट हैं तो वो हैं खुद जिंदगी…” या चित्रपटाच्या तब्बल आठ महिन्यांनी सुशांतने स्वत: आत्महत्या केली, हे सर्वांसाठीच धक्कादायक होते (67th National Film Awards Sushant Singh Rajput film Chhichhore awarded as best hindi film).

67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी

बेस्ट फीचर फिल्म – Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

बेस्टर मेल प्लेबैक सिंगर – केसरी – तेरी मिट्टी – B Praak

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस – पल्लवी जोशी

बेस्ट स्क्रीन प्ले (डॉयलॉग राइटर) – विवेक रंजन अग्निहोत्री, ताशकंद फाइल सिनेमा

सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन: अवणे श्रीमनारायण (कन्नड)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी: महर्षि (तेलुगु)

बेस्ट स्पेशल इफेक्ट : Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

स्पेशल ज्युरी अवॉर्ड: Oththa Seruppu Size 7 (तमिळ)

सर्वोत्कृष्ट गीतः कोलांबी- प्रभा वर्मा (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: डी. इम्मान, विश्वसम सिनेमा (तामिळ)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: प्रबुद्ध बॅनर्जी, ज्येष्ठोपुत्रो सिनेमा (बंगाली)

सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट: कस्तूरी (हिंदी)

पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: वॉटर बुरिअल (मोनपा)

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः आनंदी गोपाळ (मराठी)

राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः ताजमहाल (मराठी)

लोकप्रिय मसालापट: महर्षि (तेलुगु)

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट: मथुकुट्टी झेविअर, हेलन चित्रपटासाठी (मल्याळम)

(67th National Film Awards Sushant Singh Rajput film Chhichhore awarded as best hindi film)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.