होशियार!…. मोठा पडदा गाजवण्यासाठी ‘Yodha’ येतोय… सिद्धार्थ मल्होत्रा फुल टू अ‍ॅक्शनमध्ये; रिलीज डेटही ठरली!

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या फुल टू अ‍ॅक्शनने सज्ज असलेला 'योद्धा' हा सिनेमा लवकरच येत आहे. 'शेरशहा'च्या प्रचंड यशानंतर सिद्धार्थ मल्होत्रा 'योद्धा'त झळकणार आहे.

होशियार!.... मोठा पडदा गाजवण्यासाठी ‘Yodha’ येतोय... सिद्धार्थ मल्होत्रा फुल टू अ‍ॅक्शनमध्ये; रिलीज डेटही ठरली!
Sidharth Malhotra
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Nov 18, 2021 | 6:11 PM

नवी दिल्ली: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या फुल टू अ‍ॅक्शनने सज्ज असलेला ‘योद्धा’ हा सिनेमा लवकरच येत आहे. ‘शेरशहा’च्या प्रचंड यशानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ‘योद्धा’त झळकणार आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील सिद्धार्थचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची या सिनेमाच्या प्रदर्शनाकडे नजर खिळली आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावरून धर्मा प्रॉडक्शनच्या पहिल्या अ‍ॅक्शन फ्रेंचाइजीची घोषणा केली आहे. तसेच सिद्धार्थचा सिनेमातील पहिला लूकही शेअर केला आहे. या मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थ एक विमान वाचवण्याच्या मोहिमेवर असल्याचं दिसून येत आहे. मी सिद्धार्थ मल्होत्राला धर्मा प्रोडक्शनच्या पहिल्या फ्रेंचाइजी अ‍ॅक्शन सिनेमात घेण्याची घोषणा करत आहे. या सिनेमात सिद्धार्थ दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा हे करतील.

या तारखेला धुमधडाका

करण जोहरने ‘योद्धा’ कधी प्रदर्शित होणार याची तारीखही जाहीर करून टाकली आहे. प्रेक्षकांना ताटकळ ठेवण्याचा किंवा उगाचच त्यांची उत्सुकता ताणून धरण्याचा प्रयत्न केजोने केला नाही. 11 फेब्रुवारी 2022मध्ये योद्धा प्रदर्शित होणार असल्याचं केजोने स्पष्ट केलं.

पोस्टर काय सांगतं?

या सिनेमाच्या पोस्टरवरून सिद्धार्थ सैनिकाच्या भूमिकेत असल्याचं दिसून येतं. त्याच्या हातात बंदूक आहे. तो एका विमानात आहे. त्यामुळे विमान अपहरण आणि जवानांची कामगिरीशी संबंधित हा ‘योद्धा’ सिनेमा असावा असा कयास बांधला जात आहे. हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. योद्धातील सिद्धार्थचा इंटेन्स लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

स्टार कास्टची घोषणा लवकरच

सिद्धार्थसोबतच या सिनेमात कोण कोण दिसणार याबाबत मात्र काहीच माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच या स्टार कास्टची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या या सिनेमातील त्याच्या सहकलाकारांविषयींचा सस्पेन्स वाढला आहे.

एकच वाक्य, ज्याने उत्कंठा वाढवली

केजोने रिलीज केलेलं मोशन पोस्टर, त्यावरचं ट्विट, सिनेमाच्या प्रदर्शनाची जाहीर केलेली तारीख… यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांच्या या चर्चेला सिद्धार्थनेही फोडणीचा तडका देण्याचं काम केलं आहे. सिद्धार्थने इन्स्टावर एक कमेंट केलं आहे. तुमचा सीटबेल्ट लवकर बांधून घ्या. कारण जबरदस्त राईड होणार आहे, असं या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चर्चेला विषय मिळाला नसता तर नवलच!

‘थँक गॉड’ आणि वेब सीरिज

सिद्धार्थ मल्होत्रा अजय देवगनच्या ‘थँक गॉड’मध्येही दिसणार आहे. या सिनेमात रकुल प्रीत सिंह सुद्धा झळकणार आहे. तसेच रोहीत शेट्टीच्या कॉप बेस्ड वेबसीरिजमध्येही तो काम करण्याची शक्यता आहे. मात्र, तो वेबसीरिजमध्ये दिसणार की नाही याची अद्याप घोषणा झालेली नाही.

कियाराकडून क्लिन बोल्ड

गेल्या काही महिन्यांपासून त्याचं नाव कियारा आडवाणीशी जोडलं जात आहे. हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ‘शेरशाह’च्या प्रमोशनवेळी त्यानेच कियारासोबतच्या हळव्या नात्यावर भाष्य केलं होतं. आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. पण पहिल्यांदाच एका सिनेमात काम करत आहोत, असं त्याने सांगितलं होतं. या पूर्वी मी तिला ‘लस्ट स्टोरीज’च्या स्क्रीनिंगवेळी भेटलो होतो. तिच्यासोबत केजोही होता. तिच्या डिंपलच्या व्यक्तिरेखेबाबतची आम्हाला खूप उत्सुकता होती. ती अक्षरश: ही भूमिका जगली. तिच्या या कामाचं मला नेहमीच कौतुक वाटतं, असं त्याने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्धला न सांगताच अरुंधती स्वीकारणार आशुतोषची ऑफर, आता नव्या वादाला सामोरं जाणार देशमुखांचं घर!

हर घर दस्तक अभियान, दोन दिवसांत 15 हजारांवर लसीकरण, महापालिकेचा उपक्रम

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें