Bipasha Basu Welcomes Baby Girl: बिपाशा बासू 43व्या वर्षी आई झाली, गोंडस मुलीला दिला जन्म

बिपाशा आणि करण यांचा विवाह 2016मध्ये झाला होता. तब्बल सहा वर्षानंतर या जोडप्याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. लग्नानंतरही ती प्रेग्नेंट असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

Bipasha Basu Welcomes Baby Girl: बिपाशा बासू 43व्या वर्षी आई झाली, गोंडस मुलीला दिला जन्म
बिपाशा बासू 43व्या वर्षी आई झाली, गोंडस मुलीला दिला जन्म Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 3:24 PM

मुंबई: अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. बिपाशा बासू वयाच्या 43व्या वर्षी आई झाली असून तिला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांच्या घरीही काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाचं आगमन झालं होतं. त्यानंतर आता बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरही पॅरेंट कपलमध्ये सहभागी झाले आहेत.

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या घरी गोंडस पाहुण्याचं आगमन झाल्याचं वृत्त कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या आनंदाच्या क्षणी बॉलिवूड जगतातील या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रेग्नंसीच्या काळात बिपाशा बासू सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह होती. ती सतत आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट होती. तिने अनेकवेळा मॅटरनिटी फोटोशूट केले होते. सोशल मीडियावर हे फोटोही शेअर करण्यात आले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियातून तुफ्फान व्हायर झाले होते.

शिवाय तिच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षावही झाला होता. या फोटोंवर लाइक्सचा पाऊसही पडला होता. प्रेग्नंसीच्या काळात बिपाशाला घरच्यांचा प्रचंड सपोर्ट मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बिपाशा आणि करण यांचा विवाह 2016मध्ये झाला होता. तब्बल सहा वर्षानंतर या जोडप्याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. लग्नानंतरही ती प्रेग्नेंट असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यावर तिने मौन बाळगलं होतं. मात्र, या वर्षी ऑगस्टमध्ये तिने ती आई होणार असल्याचं सोशल मीडियामधून सांगितलं होतं.

लग्नानंतर बिपाशा काही काळ बॉलिवूडपासून दूरच होती. आता आई झाल्यामुळे ती आणखी काही काळ बॉलिवूडपासून दूर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये लवकरच सक्रिय होईल, असंही सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.