आधी ओळखण्यासही नकार, आता महाठकासोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल! जॅकलिनच्या अडचणी वाढणार!

जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही एक अशी अभिनेत्री आहे, जी नेहमी आनंदी दिसते. पण, लवकरच आता तिची डोकेदुखी वाढणार आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरील हसूही कदाचित नाहीसे होणार आहे. सध्या अभिनेत्रीचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तिला किस करताना दिसत आहे.

आधी ओळखण्यासही नकार, आता महाठकासोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल! जॅकलिनच्या अडचणी वाढणार!
Jacquline

मुंबई : जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही एक अशी अभिनेत्री आहे, जी नेहमी आनंदी दिसते. पण, लवकरच आता तिची डोकेदुखी वाढणार आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरील हसूही कदाचित नाहीसे होणार आहे. सध्या अभिनेत्रीचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तिला किस करताना दिसत आहे. आता ही व्यक्ती काही साधारण व्यक्ती नाही, म्हणूनच या फोटोची चर्चा सुरु आहे.

सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी आणखी वाढू शकतात. या प्रकरणात सुरुवातीपासूनच जॅकलिनचे नाव पुढे येत होते आणि तपास यंत्रणा ईडीने अभिनेत्रीला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, जेव्हा-जेव्हा जॅकलिनला सुकेशबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा प्रत्येक वेळी जॅकलिन म्हणालीय की, ती सुकेशला ओळखत नाही. मात्र, आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेशसोबत जॅकलिनचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघांमधील जवळीक स्पष्टपणे दिसत आहे.

रोमँटिक पोझ व्हायरल

जॅकलिनचा हा फोटो तपास यंत्रणांच्या हाती लागला असून, तेव्हापासून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत, जॅकलिन फर्नांडिस आणि मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आरशासमोर रोमँटिक पोझमध्ये सेल्फी घेताना दिसत आहेत. सुकेश अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आला तेव्हाचा हा फोटो असल्याचा दावा केला जात आहे. तुरुंगातून बाहेर येताच सुकेश दिल्लीहून चेन्नईला पोहोचला होता. हा फोटो चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील आहे. फोटो समोर आल्यानंतर मनी लॉन्ड्रिंगच्या या प्रकरणात जॅकलिनच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणार हे उघड आहे.

सुकेशवर फसवणुकीचा आरोप

जॅकलिन फर्नांडिसशी मैत्री करताना सुकेशने आपण मोठा उद्योगपती असल्याचे सांगितले होते. सुकेशवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि त्यामुळेच ईडीने अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले होते. रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सुकेशवर पत्नीची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचीही एजन्सीने चौकशी केली होती.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | जुनं प्रेम की फक्त मैत्री? अरुंधती-आशुतोषच्या भेटीगाठींना देशमुख कुटुंबाचा विरोध!

काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!


Published On - 3:09 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI