Karishma Kapoor | ठाकरे सरकारच्या निर्णयाचा करिष्मा कपूरला फायदा!

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. अनेकदा बातम्या येत असतात की, पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसू शकते मात्र, सध्यातरी करिश्माने कोणताही चित्रपट साइन केलेला नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:01 AM, 16 Jan 2021
Karishma Kapoor | ठाकरे सरकारच्या निर्णयाचा करिष्मा कपूरला फायदा!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. अनेकदा बातम्या येत असतात की, पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसू शकते मात्र, सध्यातरी करिश्माने कोणताही चित्रपट साइन केलेला नाही. परंतू करिश्मा परत एकदा चर्चेत आली आहे. करिश्माने तिचा मुंबईतील फ्लॅट 10.11 कोटींमध्ये विकला असल्याची बातमी आहे. तिने हा फ्लॅट मुद्रांक शुल्कात कपात झाल्यामुळे विकला असल्याची अशी चर्चा आहे ठाकरे सरकारच्या निर्णयाचा करिष्मा कपूरला फायदा झाल्याचे दिसत आहे. (Actress Karishma Kapoor sold her flat in Mumbai for Rs 10.11 crore)

 

View this post on Instagram

 

A post shared by KK (@therealkarismakapoor)

महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडेच मुद्रांक शुल्कात कपात करण्याची जाहिर केले आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. बॉलिवूडमधील बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटींनी या संधीचा फायदा घेत आपली मालमत्ता विकली आहे. करिश्मा कपूरचा हा फ्लॅट मुंबईच्या खार परिसरात होता. 20 डिसेंबर रोजी याची नोंद झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KK (@therealkarismakapoor)

Zapkey.com च्या रिपोर्टनुसार करिश्मा कपूरने या मालमत्तेवर तब्बल 20.22 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. हा घर फ्लॅट मुंबईतील वेस्टर्न खार रोज क्वीन येथे आहे. आभा दमानी यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. करिश्मा कपूर गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही चित्रपटात दिसली नाही करिश्मा कपूरचे चाहते तिच्या  पदार्पणाची मात्र, आतुरतेने वाट पहात आहेत.

संबंधित बातम्या : 

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची नवी तारीख समोर, स्थळंही ठरलं!

Kangana Ranaut | राजीव मसंद यांची ‘धर्मा प्रोडक्शन’मध्ये वर्णी, संतापलेल्या कंगनाची टीका!

Army day: अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन जैसलमेरमध्ये, वीर जवानांना अभिवादन

(Actress Karishma Kapoor sold her flat in Mumbai for Rs 10.11 crore)