Anushka sharma | मुंबईत परतल्यावर सेल्फी सेशन, ‘Sweaty Selfie’ म्हणत अनुष्का शर्माने शेअर केला पोस्ट वर्कआऊट फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करून देखील प्रसिद्धी झोतात येते. अभिनेत्री अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Anushka sharma | मुंबईत परतल्यावर सेल्फी सेशन, ‘Sweaty Selfie’ म्हणत अनुष्का शर्माने शेअर केला पोस्ट वर्कआऊट फोटो!
Anushka

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करून देखील प्रसिद्धी झोतात येते. अभिनेत्री अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा तपशील सोशल मीडियावर शेअर करत राहते. याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.

बुधवारी, तिने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वर्कआऊट सत्रानंतर एक सेल्फी शेअर केला. ती काही काळ यूकेमध्ये पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत राहत होती. ती काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीने मुंबईतील तिच्या घराच्या बाल्कनीतून स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आणि लिहिले- ‘स्वेटी सेल्फी.’

पाहा अनुष्काचा सेल्फी

या सेल्फीमध्ये अनुष्का बदललेल्या लुकमध्ये दिसत आहे. तिने आपले केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत. सेल्फीमध्ये ती निऑन टॉपमध्ये दिसत आहे. यामध्ये तिचे सौंदर्य बघून चाहतेही घायाळ झाले आहेत. सेल्फीसोबतच तिने मुंबईच्या समुद्राचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या या फोटोवर भरभरून लाईक्स करत आहेत. अनुष्काचे हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत

अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटापासून दूर आहे. शाहरुख खानबरोबर ‘जीरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता लवकरच प्रेक्षकांची ओढ संपणार आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

अनुष्काचे निळ्या रंगाच्या जर्सीमधले फोटो व्हायरल

चकदहा एक्सप्रेस या नावानं झुलन गोस्वामी प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात वेगवान महिला गोलंदाजांपैकी झुलन एक मानली जाते. 2020 च्या सुरुवातीला झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा होती. ईडन गार्डन्स मैदानावर या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटोज देखील व्हायरल झाले होते. ज्यामध्ये अनुष्का निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. त्यानंतर चित्रपटाविषयी फार काही चर्चा झाली नाही. परंतु आता पुन्हा एकदा अनुष्काचे निळ्या जर्सीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

चित्रपटाचे शूटिंग कधी?

बॉलिवूड हंगामा छापलेल्या रिपोर्टनुसार, बायोपिकच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. अशात 2021 संपण्याच्या अगोदर चित्रपटाचे शुटींग सुरु होणार नाही. 2022 च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरु होऊ शकतं, असा अंदाज आहे. अनुष्का सध्या विराटबरोबर इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे चित्रपटाचं शुटिंग लगोलग सुरु होण्याची कोणतही आशा नाहीय.

झुलनचं क्रिकेट करिअर

महिला क्रिकेटमधील सर्वांत महान गोलंदाज झुलन गोस्वामीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 19 वर्ष पूर्ण केलेल्या झुलन गोस्वामीने महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट मिळवणारी जगातील एक मात्र गोलंदाज आहे. झुलनने आपल्या इंटरनॅशनल क्रिकेट करियर मध्ये 333 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेणारी झुलन जगातील एकमेव गोलंदाज आहे. तिने 180 एकदिवसीय क्रिकेट मॅचेसमध्ये 236 विकेट घेतल्या आहेत तर 11 कसोटी सामन्यात तिने 41 महिला फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. 68 टी ट्वेंटी सामन्यात 56 विकेट तिच्या नावावर आहेत.

हेही वाचा :

Video : ‘अनुपमा’च्या सुनेचा सासऱ्यासोबत धमाल डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

Dhamaka | कार्तिक आर्यनने पूर्ण केले ‘धमाका’ चित्रपटाचे चित्रीकरण, लवकरच ट्रेलरमधून करणार धमाका!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI