Video : ‘अनुपमा’च्या सुनेचा सासऱ्यासोबत धमाल डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

प्रत्येक पात्राची स्वतःची खास फॅन फॉलोइंग आहे. शूटिंगबरोबरच प्रत्येकजण आपले खास व्हिडीओ एकमेकांसोबत चाहत्यांमध्ये शेअर करत राहतो. ('Anupama's daughter-in-law dances with father-in-law, netizens trolled after watching the video!)

Video : 'अनुपमा'च्या सुनेचा सासऱ्यासोबत धमाल डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!
वनराज, किंजल

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील टीव्ही शो ‘अनुपमा’ (Anupama) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे. हेच कारण आहे की हा शो दर आठवड्याला टीआरपी (TRP List) यादीत अव्वल असतो. या शोमध्ये दर आठवड्याला येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतात. शो बरोबरच त्याची पात्रंही प्रेक्षकांना तितकीच आवडतात. प्रत्येक पात्राची स्वतःची खास फॅन फॉलोइंग आहे. शूटिंगबरोबरच प्रत्येकजण आपले खास व्हिडीओ एकमेकांसोबत चाहत्यांमध्ये शेअर करत राहतो. अलीकडे, ‘अनुपमा’ ‘किंजल’ आणि ‘वनराज’ यांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Shah (@nidz_20)

अनुपमामध्ये ‘किंजल’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निधी तिच्या ऑन-स्क्रीन सासऱ्या सोबत म्हणजेच ‘वनराज’ अर्थात सुधांशु पांडेसोबत डान्स करताना दिसत आहे. निधी आणि सुधांशु साउथ सिनेमाच्या ‘राऊडी बेबी’ या प्रसिद्ध गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. या दरम्यान दोघांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत. निधी आणि सुधांशूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर दहशत निर्माण करत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की निधी शाहनं केशरी आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. यासोबतच तिने आपल्या केसात गजरा लावला आहे. त्याचवेळी, सुधांशु पांढऱ्या कुर्ता पायजमात दिसत आहे. निधीनं व्हिडीओ शेअर करताना एक अतिशय रोचक कॅप्शन लिहिलं आहे. तिनं लिहिलं, ‘कधीकधी केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षकच नाही तर कलाकारांनाही त्यांच्या पात्रांना विसरण्याची इच्छा असते की त्यांनी साकारलेली पात्रे फक्त पडद्यासाठी असतात आणि स्वतःला वास्तविकतेशी जोडण्यासाठी आणि मजा करायलाही रीलमधून बाहेर काढतात. हे आवश्यक आहे. ‘ चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. यावर मजेदार कमेंट्स येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘काव्याला सांगावं लागेल.’ तर दुसऱ्याने ट्रोल करताना लिहिलं, ‘भाई, तुमच्या मुलाची बायको आहे ती, थोडी लाज बाळगा.’

संबंधित बातम्या

Rana Naidu | राणा दग्गुबाती-व्यंकटेश दग्गुबाती, सुपरस्टार काका-पुतण्याची जोडी नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार!

Shalini Pandey : पदार्पण करण्यापूर्वीच शालिनी पांडेने सौंदर्यानं जिंकली चाहत्यांची मनं, आलिया-अनन्यालाही टाकलं मागे

Video | ‘परी आणि तिचा लाडका बाप्पा’, रांगोळी कलाकारालाही पडलीय लहानग्या मायराची भुरळ!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI