व्हिडीओ पाहून सोनू सूद याने दिली मकसूदला नोकरीची ऑफर, पुढे जे घडले ते आश्चर्यकारकच…

लोक पायी चालत उपाशी पोटी आपले गाव आणि घर गाठत होते. अशावेळी लोकांच्या मदतीला सोनू सूद धावून आला.

व्हिडीओ पाहून सोनू सूद याने दिली मकसूदला नोकरीची ऑफर, पुढे जे घडले ते आश्चर्यकारकच...
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 9:20 PM

मुंबई : कोरोना आणि लाॅकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. इतकेच नाही तर यादरम्यान लोकांना आपल्या घरी पोहचण्यासाठी वाहने मिळत नव्हती. लोक पायी चालत उपाशी पोटी आपले गाव आणि घर गाठत होते. या काळात कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते. याच काळात एखाद्या देवासारखा लोकांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून आला. मागेल त्याला मदत सोनू सूदने केली. सर्वांच्या अडचणींना सोनू सूद धावून गेला. यादरम्यान लोकांनी सोनू सूदचे नाव मसिहा ठेवले.

कोरोनाचा वाईट काळ गेला. मात्र, अजूनही सोनू सूद सर्वांची मदत करण्यास पुढेच आहे. इतकेच नव्हे तर एखाद्या गावात शाळा नसेल तर तिथे शाळाही बांधून सोनू देत आहे. मुलांसाठी UPSC चे फ्री क्लासेस देखील सोनू सूदने सुरू केले आहेत.

आतापर्यंत अनेकांना सोनू सूदने मदत केलीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण सोनूला मदत मागतात. विशेष बाब म्हणजे खरोखरच मदतीची गरज असेल तर सोनू लगेचच मदत करतो.

प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या मंचावर गाणारा मोहम्मद मकसूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पोट भरण्यासाठी मकसूदला रस्त्याच्या कडेला बसून गाण्याची वेळ आली.

मकसूदचा हा व्हिडीओ सोनू सूदपर्यंत पोहचला आणि त्याने लगेचच मकसूदला नोकरीसाठी ऑफर दिली. कारण व्हिडीओमध्ये मकसूद कुटुंबाचे पोट भरण्यासाठी नोकरी हवी असे म्हणत होता.

मकसूदला दोन्ही पाय नसून तो अपंग आहे. रस्त्याच्या कडेला बसून गाणे म्हणत मकसूद आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याला नोकरीची ऑफर दिली आहे.

इतकेच नाही तर नोकरीसोबत सोनूने मकसूदची राहण्याची सोय देखील केली आहे. पटनामध्ये एका शाळेत त्याला संगीत शिक्षक म्हणून सोनूने नोकरी दिली आहे.

सोनू सूदने नोकरीची ऑफर दिली तरीही मकसूदला नोकरी करण्याची काही विशेष इच्छा दिसत नाहीये. मकसूद म्हणाला की, हो मला सोनू सूदच्या आॅफिसमधून काॅल आला होता. परंतू त्यांनी मला सांगितले नाहीये की, पगार किती देणार ते.

मकसूद पुढे म्हणाला की, मी माझ्यासाठी नोकरी म्हणालो नव्हतो, तर माझ्या घरातील इतर सदस्याला. कारण कुटुंबामधील कोणालाही नोकरी मिळाली तरी उदरनिर्वाह होईल. मकसूदने आता युटर्न घेतल्याचे दिसत आहे. मकसूदला सोनूने दिलेली नोकरी करायची नाही, अशी एक चर्चा सुरू आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.