आलिया भट्ट करत आहे अपूर्ण प्रोजेक्टच्या शूटिंगची तयारी? व्हिडीओ व्हायरल
इतकेच नाहीतर रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील 2022 मध्ये रिलीज झाला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासाठी 2022 हे वर्ष अत्यंत लकी ठरले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2022 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लगेचच आलिया आणि रणबीरच्या आयुष्यामध्ये एका नन्हा परीचे आगमन झाले. इतकेच नाहीतर रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील 2022 मध्ये रिलीज झाला आणि या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. रणबीर आणि आलिया यांनी आपल्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे.
नुकताच आलिया ही जिममध्ये जाताना स्पाॅट झालीये. आलिया स्वत: ला फिट ठेवण्यासाठी तयारी करत आहे. इतकेच नव्हेतर रिपोर्टनुसार आलिया लवकरच तिचे राहिलेल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करून घेणार आहे.
आलियाने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. मात्र, त्यानंतर आता लगेचच ती कामाला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. आलियाचे काही चित्रपट देखील रिलीज होण्यासाठी तयार आहेत.
2023 मध्ये आलियाचे काही चित्रपट रिलीज होणार आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा देखील चित्रपट 2023 मध्येच आलियाचा रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया महत्वाच्या भूमिकेत आहे.
आलियाचा एक हाॅलिवूड चित्रपट देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. आता परत एकदा आलिया कामाला लागलीये.
काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याने सांगितले की, मी सध्या हाॅलिवूडमध्ये काम करण्यास तयार नाहीये. मला बाॅलिवूडचेच चित्रपट करायचे आहेत. मात्र, आलिया हाॅलिवूड चित्रपटासाठी पुर्णपणे तयार आहे.
मुलगी झाल्यानंतर रणबीर कपूर म्हणाला की, मी हे सर्व करण्यासाठी इतका जास्त टाईम का घेतला हेच मला अजून समजले नाहीये. कारण ज्यावेळी माझे मुले 20-21 वर्षांची होतील, त्यावेळी मी 60 वर्षांचा होईल.