Alia Bhatt: आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो; बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का?

आलियाच्या बेबी शॉवरला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

Alia Bhatt: आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो; बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का?
आलिया भट्टचं बेबी शॉवर
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Oct 05, 2022 | 5:04 PM

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर कपूरच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकताच आलियाचा बेबी शॉवर (Baby Shower) पार पडला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आलिया ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. त्यानंतर आता कुटुंबीयांनी तिच्यासाठी डोहाळ जेवणाचं आयोजन केलं आहे. आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि पूजा भट्ट, सासू नीतू कपूर, नणंद रिधिमा कपूर सहानी, करिश्मा कपूर आणि आजी निला देवी यांना बुधवारी सकाळी रणबीरच्या घराजवळ पाहिलं गेलं.

रणबीर-आलियाच्या मुंबईतील ‘वास्तू’ या निवासस्थानी आलियाचा बेबी शॉवर पार पडला. याच घरात एप्रिलमध्ये आलिया-रणबीर लग्नबंधनात अडकले होते. बेबी शॉवरसाठी आलियाने पिवळ्या रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता. रणबीर आणि आलियाचा खास मित्र आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनेही यावेळी हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करीना कपूर, करीश्मा कपूर, श्वेता बच्चन, नव्या नंदा आणि इतर सेलिब्रिटींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचं कळतंय. एप्रिल महिन्यात लग्न झाल्यानंतर जूनमध्ये गरोदर असल्याचं जाहीर करत आलियाने चाहत्यांना सुखद धक्का दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गरोदर असतानाही आलियाने चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच ती सिंगापूरला एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती. ती मुंबईत परतल्यानंतर बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सिंगापूरमधील पुरस्कार सोहळ्यात आलियाने अत्यंत दमदार भाषण दिलं होतं. या भाषणात तिने अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला होता. भाषणाअखेर तिने हेसुद्धा सांगितलं की संपूर्ण भाषणादरम्यान पोटातील बाळ हालचाली करत होतं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें