Gangubai Kathiawadi : ‘या’ तारखेला रिलिज होणार आलिया भट्टचा नवा चित्रपट

महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर सर्व रखडलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटांच्या रिलिज डेटची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये साऊथचे मोठे दिग्दर्शक राजामौली आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटातील संघर्ष. या दोन्ही चित्रपटात दोन कलाकार कॉमन आहेत. अजय देवगण आणि आलिया भट्ट या दोन्ही चित्रपटात दिसणार आहेत.

Gangubai Kathiawadi : 'या' तारखेला रिलिज होणार आलिया भट्टचा नवा चित्रपट
'या' तारखेला रिलिज होणार आलिया भट्टचा नवा चित्रपट
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 3:37 PM

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) चा अपकमिंग मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या रिलीज तारखेत बदल करण्यात आला आहे. आलियाचे चित्रपट एकाच दिवशी रिलिज होत होते. एक ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि दुसरा साऊथ चित्रपट ‘आरआरआर’. फिल्म निर्मात्यांनी एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यास आर्थिक फटका बसू नये यासाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या रिलिज तारखेत बदल करण्यात आला आहे. एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटात आलियाची छोटीशी भूमिका असली तरी आलियाचे नाव या चित्रपटाशी जोडणे ही मोठी बाब आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलिड होणार गंगूबाई काठियावाडी

दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलिज झाले तर कुठल्या तरी एका चित्रपटाला नुकसान सहन करावे लागेल. आणि त्यातही दोन्ही चित्रपटात आलिया भट्टने काम केले आहे. आता निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ आता 18 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात रिलिज होईल. यामुळे दोन्ही चित्रपटाशी संबंधित लोकांना दिलासा मिळाला आहे. आता दोन्ही चित्रपट सोलो रिलिजसह येतील आणि आलिया दोन्ही चित्रपटांचा वेग-वेगळा आनंद घेऊ शकेल.

महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर सर्व रखडलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटांच्या रिलिज डेटची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये साऊथचे मोठे दिग्दर्शक राजामौली आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटातील संघर्ष. या दोन्ही चित्रपटात दोन कलाकार कॉमन आहेत. अजय देवगण आणि आलिया भट्ट या दोन्ही चित्रपटात दिसणार आहेत. यामुळे हा क्लॅशही चर्चेत होता.

राजामौली यांच्या RRR शी होती टक्कर

आधी आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ 6 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून, 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलिज होणार आहे. हा एक क्राईम ड्रामा सिरीज आहे, जी हुसैन जैदींच्या उपन्यास बपरवर आधारित आहे. अजय देवगणने या चित्रपटात करीम लालाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांचे आहे. हा चित्रपट त्यांच्या ड्रिम प्रोजेक्टपैकी एक आहे. आलिया भट्टच्या चित्रपटाचा टीझर आधीच रिलिज करण्यात आला होता. यामध्ये आलियाच्या उत्तम अॅक्टिंगची झलक पहायला मिळाली होती आणि भूमिकेबद्दलही लोकांना माहिती मिळाली. आतापर्यंत या चित्रपटात अजय देवगणच्या भूमिकेचा पोस्टर किंवा व्हिडिओ समोर आला नाही. प्रेक्षकांना याची प्रतिक्षा आहे. (Alia Bhatt’s new film Gangubai Kathiawadi release on february 2021)

इतर बातम्या

Prithviraj Teaser Out | उलगडणार इतिहासातील सुर्वण पान, बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Mouni Roy : मौनी रॉयने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, पाहा फोटो!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.