AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma : मनोरंजन करायला सज्ज अनुष्का शर्मा! तीन मोठ्या प्रोजेक्ट्ससह परतणार?

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर त्यातच ती खूप व्यस्त होती. जवळपास दोन वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर होती. मात्र आता ती चित्रपटांमध्ये पुनरागमन (ComeBack) करण्यास सज्ज झालीय.

Anushka Sharma : मनोरंजन करायला सज्ज अनुष्का शर्मा! तीन मोठ्या प्रोजेक्ट्ससह परतणार?
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 8:53 PM
Share

मुंबई : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर त्यातच ती खूप व्यस्त होती. जवळपास दोन वर्षांपासून ती चित्रपटांपासून दूर होती. मात्र आता ती चित्रपटांमध्ये पुनरागमन (ComeBack) करण्यास सज्ज झालीय. तिचे चाहतेही तिच्या चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहताहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अनुष्का तीन प्रोजेक्ट साइन करण्यास तयार आहे, त्यापैकी दोन थिएटर प्रोजेक्ट्स असतील. त्यासोबत एका OTT ओरिजनल चित्रपटातदेखील ती दिसणार आहे. भारतातला डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी चित्रित केलेला सर्वात मोठा असा तो चित्रपट मानला जातोय.

वर्षाच्या सुरुवातीला होणार घोषणा? एका स्रोतानुसार, 2022मध्ये अनुष्का शर्माचं चित्रपटांमध्ये पुनरागमन ही आमच्या चित्रपट उद्योगासाठी चांगली गोष्ट आहे. ती मुख्यतः तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसण्याची अपेक्षा आहे, त्यापैकी दोन मोठ्या पडद्यावर मनोरंजन करणारे आहेत, तर एक OTT प्रोजेक्ट आहे. भारतातला डिजिटल क्षेत्रात बनवला जाणारा हा सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला याची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. अनुष्काचे चाहतेही यामुळे खुश होतील.

चर्चेचा भाग अनुष्काचा हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा हिट्स देण्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड, उत्कृष्ट, अष्टपैलू अभिनय कौशल्य यामुळे हे प्रकल्प आधीच चर्चेचा विषय बनले आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा एक भाग होण्यासाठी अनुष्काही नेहमीच उत्सुक असते. ती तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल आणि तिला सिनेमाचा एक भाग व्हायचं आहे, हे अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

मुलगी होणार एक वर्षाची अनुष्का शर्माचे तीन चित्रपट आहेत, ज्यांनी 300 कोटींचा टप्पा ओलांडला. सुलतान, पीके आणि संजू. आता अनुष्का शर्माची मुलगी वामिका लवकरच 11 जानेवारी रोजी एक वर्षाची होणार आहे. त्यानंतर अभिनेत्री अनुष्का पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झालीय.

Kitchen Kallakar : राजकारणातले कल्लाकार किचनमध्ये..! धमाल उडवून देणारे लज्जतदार किस्से, पाहा Video

Murder at Teesri Manzil 302 Review : 14 वर्षांनंतर रिलीज झाला इरफान खान यांचा सिनेमा; कसा आहे, वाचा…

Year Ender 2021 : ‘रांझा’पासून ते ‘नदियों पार’ पर्यंत, ‘या’ सुपरहिट गाण्यांनी 2021मध्ये घातला धुमाकूळ!

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.