Kitchen Kallakar : राजकारणातले कल्लाकार किचनमध्ये..! धमाल उडवून देणारे लज्जतदार किस्से, पाहा Video

झी मराठीच्या किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात तरुण राजकारणी रोहित पवार(Rohit Pawar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी हजेरी लावली.

Kitchen Kallakar : राजकारणातले कल्लाकार किचनमध्ये..! धमाल उडवून देणारे लज्जतदार किस्से, पाहा Video
किचन कल्लाकार (सौ. झी मराठी)
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 8:01 PM

मुंबई : राजकारणातले दिग्गज आता किचनमध्ये घुसले आहेत. होय.. झी मराठीच्या किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात तरुण राजकारणी रोहित पवार(Rohit Pawar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही. तर चविष्ट पदार्थही या दिग्गजांनी केले. आता त्याची चव प्रत्यक्ष तर चाखला येणार नसली तरी किचनमधली धमाल मात्र आम्ही तुम्हाला अनुभवायला देणार आहोत. चला पाहू या…

एक से बढकर एक किस्से अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) या शोमध्ये परीक्षक आहेत. सहभागी झालेल्या किचन कलाकारांना ते गुण देणार आहेत. या आठवड्यातल्या एपिसोडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सहभागी झाल्या. त्यांनी आपल्या खवय्येगिरीचे एक से बढकर एक किस्सेही यावेळी सांगितले.

‘दुसऱ्या शोमध्ये रॉयल्टी द्यावी लागेल..’ रोहित पवार यांनी चला हवा येवू द्या शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांना सांगितलं, की चला हवा येवू द्या च्या लेखकाला वाटतं तुम्ही वारंवार यावे, यावेळी रोहित पवार म्हणाले, मला बोलवायचं असेल तर रॉयल्टी द्यावी लागेल. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

‘तुम्हाला पाहिलं की टेन्शन येतं’ आज मी उसळ आणि भाकरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. डाळ कच्ची वगैरे राहणार नाही, याची काळजी घेईल. खरंतर तुम्हाला पाहिलं की टेन्शनच येतं. कारण रिझल्ट काय येणार, हे महत्त्वाचं आहे, असं प्रणिती शिंदे प्रशांत दामलेंना यावेळी म्हणाल्या.

‘आधी मी पक्की मांसाहारी होते’ आमच्याकडे ज्योतिर्लिंग असल्यानं किमान श्रावण आम्ही पाळायचो. यावेळी मांसाहार आम्ही करायचो नाही. आधी मी पक्की मांसाहारी होते, मात्र काही वर्षांपूर्वीच नॉनव्हेज सोडलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी गटारी आमावस्येची एक धमाल आठवणही सांगितली. झी मराठीच्या किचन कल्लाकारच्या एपिसोड सात आणि आठमध्ये ही धमाल अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सहभागी कल्लाकार किचनमधल्या विविध खेळातही सहभागी होणार आहेत.

(व्हिडिओ सौजन्य – झी मराठी)

Murder at Teesri Manzil 302 Review : 14 वर्षांनंतर रिलीज झाला इरफान खान यांचा सिनेमा; कसा आहे, वाचा…

BTS बँड नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या चाहत्यांना देणार ‘हे’ खास सरप्राइझ…

Year Ender 2021 : ‘रांझा’पासून ते ‘नदियों पार’ पर्यंत, ‘या’ सुपरहिट गाण्यांनी 2021मध्ये घातला धुमाकूळ!

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.