Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि आर्यन खान (Aryan Khan) यांच्यामध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅट्सचा आज एनसीबीकडून सखोल तपास होणार आहे. या दोघांच्या चॅट्समध्ये ड्रग्ज अँगलचा एनसीबीकडून आज (22 ऑक्टोबर) तपास केला जाणार आहे.

Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!
Aryan-Ananya

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि आर्यन खान (Aryan Khan) यांच्यामध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅट्सचा आज एनसीबीकडून सखोल तपास होणार आहे. या दोघांच्या चॅट्समध्ये ड्रग्ज अँगलचा एनसीबीकडून आज (22 ऑक्टोबर) तपास केला जाणार आहे. काल (21 ऑक्टोबर) अनन्याची दोन तास चौकशी झाली. आजही समीर वानखेडे अनन्याची चौकशी करणार आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हे खूप चांगले आणि जुने मित्र आहेत. आर्यन खान हा ड्रग्ज घेत होता, हे तिला माहीत होतं का, होतं तर कधी पासून माहीत होतं? कधी कुठल्या पार्टीत त्याने ड्रग्ज घेतलं होतं का?, या आणि अशा अनेक अंगांनी आज तपास होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअप चॅट व्यतिरिक्त अनन्याविरोधात एनसीबीकडे कोणताच ठोस पुरावा नाही, त्यामुळे तपासावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आलेले आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेदेखील आर्यन खानच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे. ही माहिती समोर येताच आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. तपासादरम्यान आर्यन खानची व्हॉट्सअॅप चॅटिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले आहेत.

एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली

“आर्यन खान हा व्हिआयपीचा मुलगा आहे, म्हणून त्याला जामीन मिळत नाही अस मी म्हणनार नाही. एनसीबीला आर्यन खानची व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग सापडली आहे. या चॅटिंगमध्ये जे तथ्य आहेत किंवा जे पुरावे आहेत त्याचा आधार घेत आर्यनचा जामीन नकारला गेला आहे. व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंग ग्राह्य धरायची की नाही हे कोर्टात निश्चित होणार,” असे निकम यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार

तसेच पुढे बोलताना त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचाही दाखला दिला. “प्रमोद महाजन त्यांचा भाऊ प्रविण महाजन याने त्यांना एक मेसेज पाठविला होता. त्याच मेसेजचा आधार घेत त्याच्यावर आरोप केला होता. नंतर कोर्टात त्या मेसेजचा संदर्भ सिद्ध करावा लागला. म्हणून एनसीबीला मुंबई हायकोर्टात आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे वकीलदेखील आपली बाजू मंडणार आहेत,” असे निकम म्हणाले.

आर्यन खानला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत.

हेही वाचा :

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात NCBची धडक कारवाई, आणखी एक ड्रग्ज पेडलरला घेतले ताब्यात!

अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI